Dhule: Pratibha Chaudhary while inspecting the status of drain cleaning in the city. Neighbor Devidas Tekale and staff. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 15 दिवसांत नालेसफाई पूर्ण होणार; महापौर प्रतिभा चौधरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या कामाची महापौर प्रतिभा चौधरी यांनी शनिवारी (ता. २०) पाहणी केली.

येत्या पंधरा दिवसांत नालेसफाई पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना कामात हलगर्जीपणा केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर चौधरी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

आयुक्त देवीदास टेकाळे, उपायुक्त विजय सनेर, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, साईनाथ वाघ, संदीप मोरे, गजानन चौधरी, प्रमोद चव्हाण, मनीष आघाव आदी पाहणीप्रसंगी उपस्थित होते. (Mayor Pratibha Chaudhary say Drainage completed in 15 days Dhule News)

सफाईसाठी नियोजन

महापालिका क्षेत्रात एकूण सात मुख्य नाले व २२ उपनाले अस्तित्वात आहेत. या नाल्यांमधील कचरा साफ करण्यासाठी व पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याकरिता मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

यात भाडेतत्त्वावर दोन जेसीबी मशिन व एक पोकलँड मशिन तसेच, महापालिकेच्या मालकीचे एक जेसीबी अशी वाहने नालेसफाईकामी कार्यरत आहेत. तसेच, गाळ व कचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर तसेच आवश्यक वाहने उपलब्ध आहेत.

ठिकठिकाणी पाहणी

प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या भागातील नालेसफाईकामी स्वतंत्र पथक नियुक्तीबाबत आदेश दिले आहेत. मुख्य नालेसफाईचे काम टप्प्याटप्प्याने उपलब्ध साधनांद्वारे केले जात आहे. आजपर्यंत तीस टक्के नालेसफाई झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील संपूर्ण नालेसफाईचे नियोजन केले आहे. महापौर चौधरी यांनी शनिवारी सुशीनाला, जिल्हा परिषद कॉलनी, एकतानगर आदी भागांतील नालेसफाई कामांची पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पारदर्शक कामकाजाची सूचना

नाल्यामधून काढलेला गाळ व कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावणे, नाल्यांमधील व मोऱ्यांमधील संपूर्ण स्वच्छता करून पाण्याचा प्रवाह मोकळा करणे, सफाईसाठीच्या वाहनांचे मीटर रीडिंग आणि कामांच्या तासांचे योग्य पद्धतीने रेकॉर्ड ठेवणे तसेच, पंधरा दिवसांत संपूर्ण नालेसफाई स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करून कार्यवाही करणे, दैनंदिन कामाचा अहवाल सादर करणे याबाबतचे आदेश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नालेसफाईच्या कामात गैरप्रकार किंवा हलगर्जीपण करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेशही महापौरांनी आयुक्तांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT