जळगाव - महापालिकेत मंगळवारी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात झालेल्या बैठकीस उपस्थित आयुक्त चंद्रकांत डांगे व रेल्वेचे अधिकारी.
जळगाव - महापालिकेत मंगळवारी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात झालेल्या बैठकीस उपस्थित आयुक्त चंद्रकांत डांगे व रेल्वेचे अधिकारी. 
उत्तर महाराष्ट्र

भोईटेनगर रेल्वेफाटकावर उड्डाणपूल

सकाळवृत्तसेवा

जळगाव - भोईटेनगर व सुरत रेल्वेफाटकावर वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उड्डाणपूल करण्याबाबत आज महापालिका व रेल्वे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. तीत भोईटेनगर ते सुरत रेल्वेफाटकापर्यंत उड्डाणपूल करण्याबाबत चर्चा झाली. या पुलाचे सुधारित अंदाजपत्रक रेल्वे व महापालिका मिळून तयार करणार आहे.

महापालिकेत आज आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात रेल्वे विभागाचे वरिष्ठ अभियंता राहुल अग्रवाल, एम. के. पाटील व महापालिकेच्या अभियंत्यांची बैठक झाली. तीत सेंट्रल व वेस्टर्न मार्गावरील रेल्वेफाटकावर वाहतुकीचा प्रश्‍न पूल बांधून सुटू शकतो का? याबाबत चर्चा झाली. सेंट्रल मार्गावरील भोईटेनगर रेल्वेफाटक, तसेच वेस्टर्न रेल्वेमार्गावरील सुरत रेल्वेफाटकावरील वाहतूक थेट शिवाजीनगर रस्त्यावरील बुद्धविहाराजवळ पूल बांधून उतरविली जाणार आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी रेल्वे ५० टक्के, तर ५० टक्के रक्कम महापालिका देईल. याबाबत महापालिका हिश्‍श्‍याची रक्कम शासनाकडे विशेष अनुदान म्हणून मागू, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

मालधक्का रस्त्याचे काँक्रिटीकरण
अवजड वाहनांची वर्दळ असल्याने मालधक्का रस्ता खराब होत आहे. त्यामुळे धूळ व प्रदूषणाचा त्रास परिसतात होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने रेल्वे विभागाला बैठकीत तते सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्याची मागणी केली. रेल्वे विभाग दोन ते तीन महिन्यांत हा रस्ता तयार करून देणार आहे.

रेल्वेफाटकावर ‘क्रॉसबार’ बसवणार
रेल्वे मालधक्‍क्‍यावरून अवजड वाहने भोईटेनगर रेल्वेफाटकामार्गे रिंग रोडने जातात; परंतु या अवजड वाहनांमुळे अपघात, रस्ते खराब तसेच प्रदूषण वाढत असल्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन भोईटेनगर फाटकावर ‘क्रॉसबार’ बसविणार आहे, तर अवजड वाहनांना खोटेनगरमार्गे महामार्गाद्वारे जाता येणार आहे.

दहा दिवसांत तयार होणार अंदाजपत्रक
उड्डाणपुलाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याबाबत महापालिका प्रशासनाने आज रेल्वे विभागाला पत्र दिले असून, रेल्वे विभाग १० दिवसांत सुधारित अंदाजपत्रक तयार करणार आहे. आधी भोईटेनगर रेल्वेफाटकाचे २२ कोटींचे अंदाजपत्रक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT