उत्तर महाराष्ट्र

"मिग-29'च्या ताकदीत मोठी वाढ 

समीर बोराडे

नाशिक - भारतीय हवाई दलातील लढाऊ "मिग-29' विमानांत होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे त्यांच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशातील 50 टक्के "मिग-29'चे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. 2021 अखेरपर्यंत हे काम 100 टक्के पूर्ण होणार असल्याचे ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोचे एअर ऑफिसर कमांडिंग समीर बोराडे यांनी सांगितले. 

हवाई दलाचा 86 वा वर्धापन दिन आठ ऑक्‍टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ओझरमध्ये आयोजित कार्यक्रमानिमित्त एअर कमांडिंग ऑफिसर समीर बोराडे यांनी 11 बेस रिपेअर डेपो आणि येथे होत असलेल्या विमानांचे आधुनिकीकरण, देखभाल आणि दुरुस्ती संदर्भात माहिती दिली. 

ते म्हणाले, ""आज 11 बेस रिपेअर डेपो हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण देखभाल दुरुस्तीची कामे करत आहे. हवाई दलात समाविष्ट असलेल्या "मिग-29' आणि "सुखोई-30' या विमानांची देखभाल आणि दुरुस्तीही येथे केली जाते. आता "मिग-29'चे आधुनिकीकरण करण्यात येत असून, सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आता करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे आयुष्य 35 ते 40 वर्षांपर्यंत पोचले आहे. आधुनिकीकरणामुळे हवाई क्षमतेबरोबरच हवेतल्या हवेत आणि जमिनीवर मारा करता येणार आहे. यासह हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सुविधाही करण्यात येत आहे. तसेच रडार व्यवस्था अधिक मजबूत केली जात असल्याने वैमानिकांना आपले लक्ष्य आता साध्य करणे आधिक सोपे होणार आहे.'' 

"मिग-29'मध्ये यासह ट्‌वीन इंजिन, मिसाईल, गाईडिंग बॉम्ब, गन अशी शस्त्रास्त्रेही समाविष्ट करण्यात आली आहेत. वैमानिकांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला असून, अपघातांमध्येही खूप मोठी घट झाली असल्याचेही एअर ऑफिसर कमांडिंग बोराडे यांनी सांगितले. "सुखोई-30'च्या देखभाल व दुरुस्तीचे काम 11 बेस रिपेअर डेपोमार्फत केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

परिपूर्ण दुरुस्ती केंद्र 
"मिग-29'च्या आधुनिकीकरणासाठी आवश्‍यक असलेले सर्व प्रकारचे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. आधुनिकीकरणासाठी लागणारे सर्व प्रकारचे सुटे भाग हे आपल्याकडेच तयार होत असल्याने आपण परिपूर्ण झालो असून यामुळे दुसऱ्यांवर आता अवलंबून राहावे लागत नसल्याचेही एअर ऑफिसर कमांडिंग बोराडे यांनी सांगितले. तसेच आधुनिकीकरणासाठी "सुखोई-30'ला लागत असलेला 22 महिन्यांचा कालावधी 17 ते 18 महिन्यांवर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

11 बेस रिपेअर डेपोमार्फत झालेले आधुनिकीकरण 
एसयू-7 100 1975-1983 
मिग-21 28 1983-1988 
मिग-23 248 1988-2015 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT