Hike In Milk Rate latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : दूध लिलावात दापुऱ्यातील दूधाला सर्वाधिक भाव!

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : दापुरा (ता. धुळे) येथील दूध सर्वात महाग झाले असून, उदय दूध उत्पादक संस्थेचे दूध लिलावात ८४ रुपये लिटर दराने बोली लावली. मालपूरच्या मधुरम डेअरी फार्म या एका दुग्ध संकलनालयाने हा भाव देऊ केला. रविवारी (ता. ९) दुपारी हा लिलाव झाला. (milk of dapura gets highest price in auction dhule news)

दरम्यान दापुरा येथून सोनगीरला मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होतो. तो ८४ रुपये दराने दूध व्यापाऱ्यांना मिळेल. ते सर्व सामान्य ग्राहकांना ८४ रुपये लिटरपेक्षा अधिक भावाने दूध विकले जाणार आहे. दापुरा येथील दूध अगदी शुद्ध असते.

येथील दुधाला जिल्ह्यातून सर्वाधिक मागणी असते. प्रत्येक कुटुंब दूध उत्पादक शेतकरी कुटुंब आहे. भरपूर हिरवा चारा व पुरेशी उत्कृष्ट ढेपचे खाद्य व म्हैस पालनाचे वेगळे तंत्र यामुळे दूध उत्तम मिळते असे दूध उत्पादक शेतकरी पंकज पाटील यांनी सांगितले.

दापुरा येथे दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळी व सायंकाळी प्रत्येकी १२०० लिटर दूध निघते. दोन्ही वेळा प्रत्येकी सुमारे ३०० लिटर दूध सोनगीर व परिसरात विकले जाते. उर्वरित प्रत्येकी ९०० लिटर दूध लिलावात ८४ रुपये लिटर दराने विकले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT