Minister Dr. Vijayakumar Gavit Welcome procession  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : मंत्री डॉ. गावित यांचे नंदनगरीत स्वागत

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : राज्याचा मंत्रिमंडळात डॉ. विजयकुमार गावित यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचे नंदुरबार शहरात आगमन झाले. त्यासाठी सकाळपासूनच ग्रामीण भागातील कार्यकर्ते शहरात दाखल झाले होते.

शहरातील दुळे रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिकेटिव्ह जवळ सांयकाळी पाचला त्यांचे कारने आगमन होताच घोषणांसह ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर त्यांची शहरातील मुख्य मार्गावरून त्यांचा निवासस्थानापर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. (Minister Dr vijaykumar Gavit welcome to Nandnagar Nandurbar Latest Marathi News

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात नंदुरबार येथील भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश झाला. मंत्रिमंडळातील समावेशानंतर शुक्रवारी प्रथमच ते नंदुरबार शहरात दाखल झाले.

मुंबई ते नंदुरबार प्रवासात त्यांचा ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळे, दोंडाईचा मार्गे सत्कार स्वीकारत सांयकाळी पाचच्या सुमारास मंत्री डॉ. गावित यांचे नंदुरबार शहरात आगमन झाले. धुळे रस्त्यावर शहराच्या सीमेवरच कार्यकर्त्यांनी दुपारपासून स्वागतासाठी गर्दी केली होती.

ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जथ्था शहरात येण्यास सकाळपासूनच सुरू झाला होता. त्यांच्या निवासस्थानापासून तर खोडाईमाता रस्त्यावर वाहनांची रीघ लागली होती. विविध आदिवासी संघटना, कार्यकर्ते यांनी आदिवासी पारंपारिक नृत्य पथक, ढोल ताशांचे पथक, डी.जे. आदी सज्ज ठेवले होते.

हजारो चाहत्यांचा जनसमुदायाने त्यांचे स्वागत करीत शहरातील मुख्य रस्त्यावरून सवाद्य स्वागत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक तरुण कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, नृत्य करीत जल्लोष केला. मोकळ्या कारवरून जनतेला अभिवादन करीत डॉ. गावित यांची स्वागत मिरवणुक तीन तास सुरू होती.

यावेळी त्यांची खासदार कन्या डॉ. हीना गावित, जि. प. सदस्या डॉ. सुप्रिया गावित, भाजपचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, लक्ष्मण माळी, सागर तांबोळी उपस्थित होते. रस्त्यात नागरिकांकडून सत्कार स्वीकारत, अभिवादन करीत डॉ. गावित हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निवास्थानी पोचले.

तेथे त्यांचे औक्षण करीत स्वागत करण्यात आले. निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, कार्यकर्ते सत्कारासाठी गर्दी करून होते. डॉ. गावित यांना मिळालेल्या मंत्री पदामुळे जिल्ह्याचा विकासाला पुन्हा गती येईल, अशी अपेक्षा स्वागतासाठी आलेल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT