The workers keep track of
The workers keep track of 
उत्तर महाराष्ट्र

मंत्री झोपेत; कार्यकर्ते राखणीला

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्याचे पशूसंवर्धन व दूग्धविकास मंत्री महादेव जानकर हे खासगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला आले. त्यांची भेट घेऊन पक्षाच्या ध्येयधोरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते विश्रामगृहावर पोहोचले मात्र मंत्री महोदय आले तसे, एका खोलीत जाऊन झोपले. तब्बल साडेतीन तास थांबून राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी 10 मिनिटेही न देता सदिच्छा भेट देण्यासाठी निघून गेले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज झाले. 

पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोल्फ क्‍लब येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. त्यांची प्रतिक्षा करीत रासपचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते थांबले होते. परंतु मंत्री महोदय यांनी 'हाय-बाय' करीत तडक विश्रामगृहातील खोली गाठली आणि झोपून घेतले. दुपारी दोन वाजेपासून थांबलेले कार्यकर्ते साडेपाच वाजेपर्यंत त्यांच्या खोलीबाहेर थांबून होते. रासपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्षाच्या जिल्ह्यातील कामकाजाची अन्‌ आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ध्येयधोरणाविषयी चर्चा करायची होती.

काही सांगायचे होते, काही बोलायचे होते, परंतु मंत्री महोदयांनी अडीच साडेतीन तास झोप घेतल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांत आलेल्यांकडून स्वागताचे पुष्पगुच्छ स्वीकारले. एकाही पदाधिकाऱ्याशी वा कार्यकर्त्यांशी चर्चा न करता शहरातील एकाच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी निघून केले. त्यामुळे साडेतीन तास थांबूनही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलता न आल्याने ते चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT