MLA jaykumar raval esakal
उत्तर महाराष्ट्र

Minority Development Scheme: शिंदखेडा मतदारसंघात एक कोटीचा निधी; आमदार रावल यांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : दोंडाईचा-शिंदखेडा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासकामांसाठी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून एक कोटीचा निधी मंजूर झाला.

याबाबत शासन निर्णय प्राप्त झाला आहे. त्यात २५ लाखांचा निधी दोंडाईचा शहरासाठी, तर ७५ लाखांचा निधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी खर्च होईल. (Minority Development Scheme One crore fund in Shindkheda Constituency Follow up of MLA Rawal dhule)

अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांना अल्पसंख्याक विकास निधीतून विकासकामे करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी आमदार रावल यांनी केली.

त्यानुसार दोंडाईचा येथे दादावाडी जैन तीर्थस्थळाजवळील रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी २५ लाख रुपये, वर्षी येथे अल्पसंख्याक वस्तीत सभागृह बांधकाम करण्यासाठी १५ लाख, बेटावद येथे मंगलचंद जैन यांच्या घरापासून ते महावीर जैन यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणासाठी १५ लाख,

बाभुळदे येथे अल्पसंख्याक वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी दहा लाख, निमगूळ येथे अल्पसंख्याक वस्तीत मूलभूत सुविधा करण्यासाठी दहा लाख, विरदेल येथे अल्पसंख्याक कब्रस्तानला कंपाउंड करण्यासाठी पंधरा लाख, तसेच वालखेडा येथे अल्पसंख्याक वस्तीत रस्ता काँक्रिटीकरणासाठी दहा लाख असा एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील अल्पसंख्याक बांधवांनी आमदार रावल यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT