MLA Farooq Shah during a surprise visit to Shree Bhausaheb Here Government Medical College and Sarvopachar Hospital
MLA Farooq Shah during a surprise visit to Shree Bhausaheb Here Government Medical College and Sarvopachar Hospital esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule news : आमदार फारूक शाह यांची हिरे मेडिकलला ‘सरप्राइज व्हिजिट’

सकाळ वृत्तसेवा

Dhule news : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला आमदार फारूक शाह यांनी मंगळवारी (ता. ६) सरप्राइज व्हिजिट दिली. या भेटीत रुग्णालयातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची हलगर्जी यासह इतर समस्यांवर अधिष्ठातांसह इतर अधिकारी, डॉक्टरांशी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय हे धुळे शहर व जिल्ह्यासाठी वरदान आहे. (MLA Farooq Shahs surprise visit to Hire Medical dhule news)

मात्र, काही कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे रुग्ण व नातेवाइकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने रुग्णालयास अचानक भेट दिली. या वेळी रुग्णालयातील अस्वच्छता व कर्मचाऱ्यांची हलगर्जी अधिष्ठाता डॉ. भामरे यांच्या निदर्शनास आणून दिली.

डॉ. भामरे यांच्या दालनात बैठक घेऊन सर्व विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. सफाई कामगारांची अपेक्षित संख्या नसणे, तांत्रिक कर्मचारी, डॉक्टरांची कमतरता यांसारख्या समस्या जाणून घेतल्या.

तसेच या समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे बैठक लावून समस्यांचे निराकरण करण्याबाबत अधिकाऱ्यांना आश्वासित केले. दरम्यान, अधीक्षक डॉ. पाठक, डॉ. अरुण मोरे, डॉ. मुकरम खान, डॉ. परवेज मुजावर, प्रशासन अधिकारी कुमावत यांच्यासोबत बाह्यरुग्ण विभागाचीही पाहणी केली व संबंधितांना सक्त सूचना केल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

या भेटीप्रसंगी गनी डॉलर, रफीक पठाण, आसिफ शाह, अकिब अली, जुबेर शेख, फैसल अन्सारी, सऊद आलम, सलमान खान, समीर शाह, शाहरुख शाह आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT