Congress officials along with villagers inspecting the dead sheep esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मेंढ्या दगावल्याची नुकसानभरपाई द्या; विधिमंडळात मेंढपाळांच्या मदतीसाठी उठविला आवाज

सकाळ वृत्तसेवा

धुळे : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) , वादळ आणि गारपिटीमुळे धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तालुक्यात अद्याप पंचनाम्याचे काम सुरू झालेले नाही. जिल्ह्यात हे काम संथगतीने सुरू आहे. (MLA Kunal Patil demanded Legislation Panchnama of damaged crops and financial compensation should given immediately dhule news)

त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून तत्काळ आर्थिक नुकसानभरपाईही द्यावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात गुरुवारी (ता. २३) केली. दरम्यान, सायने (ता. धुळे) येथील मेंढपाळांचा वाडा पिंपळे खुर्द (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे मेंढ्या चारण्यासाठी गेला होता.

या ठिकाणी बुरशीजन्य गहू खाल्ल्याने असंख्य मेंढ्या दगावल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मेंढपाळ बांधवांनाही तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वारा आणि गारपिटीचा प्रचंड फटका बसला आहे.

त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, दादर, ज्वारी, टरबूज, पपई यांच्यासह फळ व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तरीही धुळे तालुक्यात अद्याप नुकसानीचा पंचनामा सुरू नाही. या कामाला गती देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मेंढपाळांची व्यथा

धुळे तालुक्यातील सायने येथील मेंढपाळांच्या शेकडो मेंढ्या बुरशीजन्य गहू खाल्ल्याने दगावल्या. ही घटना २१ मार्चला पिंपळे खुर्द (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे घडली. त्यामुळे आमदार पाटील यांनी मेंढपाळांची व्यथा विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडली. सायने येथील मेंढपाळांच्या २५० मेंढ्या पिंपळे खुर्दमध्ये चरण्यासाठी गेल्या.

अवकाळी पावसातील बुरशीजन्य गहू खाल्ल्याने सरासरी शंभरपेक्षा अधिक मेंढ्या दगावल्या. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र, मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT