Nashik 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : नाशिकमध्ये मनसेची माघार; काँग्रेस आघाडीला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक पूर्व मधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची माघार घेण्याचा निर्णय आज (सोमवार) घेतला. साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

मुर्तडक यांच्या माघारीमुळे पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले व भाजपमधून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आमदार बाळासाहेब सानप यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी बैठकीत निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्व विधानसभा मतदारसंघातून माघार घेताना मनसेचे उमेदवार उमेदवार नितीन भोसले यांना काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप पर्यंत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने मनसेची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मामा ठाकरे, दिलीप भामरे तसेच अपक्ष अर्ज दाखल अहिरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर उमेदवारी करण्यावर ठाम आहे तर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे नॉटरिचेबल असल्याने तेही उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याची शक्यता आहे. 

नाशिक पूर्व मधून माघार घेतलेली मनसेचे अशोक मुर्तडक यांनी मला पक्षाने भरपूर काही दिले आहे. साहेबांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT