molestation of married woman by young man dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तू खूप आवडस मना संग लगीन कर; तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दराणे (ता. शिंदखेडा) येथे २२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

मंगळवारी (ता. ११) शिंदखेडा पोलिस ठाण्यात तरुण, त्याची आई, वडील व आजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.(molestation of married woman by young man dhule crime news)

दराणे येथील घरकाम करणाऱ्या विवाहितेचा गावातील भय्या दिलीप ठाकरे सात-आठ दिवसांपासून शेताच्या रस्त्यावर भेटून ‘तू खूप आवडस, तुनावर मनं प्रेम से, मना संग लगीन कर!’ असे वारंवार बोलून पाठलाग करीत होता. त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून तेथून निघून जात होते.

या प्रकाराबाबत घाबरून घरात पती, तसेच सासु-सासरे यांना काही सांगितले नव्हते. त्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून घराबाहेर निघून कोठेही जात असताना भय्या ठाकरे जास्तच पाठलाग करीत असून, याबाबत गावात कोणास काही कळाले तर बदनामी होईल अशी भीती वाटत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घराच्या पायऱ्यांवर बसलेले असताना पती तसेच सासू-सासऱ्यांनी भय्या ठाकरे याला जाब विचारला असता ठार करण्याची धमकी देत शिवीगाळ करून दमदाटी केली.

भय्या ठाकरे, त्याची आई छोटीबाई दिलीप ठाकरे, वडील दिलीप पिरन ठाकरे व आजी सारसताबाई पिरन ठाकरे यांच्याविरोधात विनयभंग, ठार करण्याची धमकी व मारहाणीचा गुन्हा शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT