guruji.jpg
guruji.jpg 
उत्तर महाराष्ट्र

उपक्रमशील 'या' गुरूजींचा प्रेरणादायी ध्यास

राजेंद्र दिघे: सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : सतत धडपड व कार्यमग्न असलं की यशाला गवसणी घालता येते. छोट्या गावात पालक संपर्क झटकन होतो.मुलांच्या प्रगतीने पालकांची आपुलकी वाढली.आगळ्या वेगळ्या उपक्रमांतुन गुणवत्ता हीच कास धरत वाटचाल केली. जुन्याच सहकारी शिक्षकांचे उत्तम काम गतीशील करुन उपक्रमयुक्त गुणवंत शाळा निमगुले लहान (ता.मालेगाव) सर्वत्र परिचित आहे.प्रसिद्धीत न राहता सिद्धीस जाणा-या प्रयोगशील संजय बेडसे यांची गुणात्मक वाटचाल.  
 

लेकरांशी समरस होत बेडसे यांची नाळ गुणवत्तेशी जोडली

लोकवर्गणीतून साऊंड सिस्टिम, प्रिंटरसह भौतिक सुविधा उपलब्ध केल्या. शाळेचा परिसर सर्वांग सुंदर सुशोभित आहे. मपंचायत निमगुले खुर्दने तीस ट्री गार्ड उपलब्ध करून परिसरात वृक्षसंगोपण करताय.मुख्याध्यापक बाळकृष्ण आहेर यांची  जोड मार्गदर्शक आहे. तत्कालीन शिक्षक भाऊसाहेब कापडणीस, संजय पवार, सुवर्णा सोळंकी यांची येथील कामगिरी आदर्शवत आहे. तोच पाया प्रेरणास्रोत ठरला. लेकरांशी समरस होत बेडसे यांची नाळ गुणवत्तेशी जोडली गेली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर 'कौन बनेगा विजेता' हा भन्नाट उपक्रम लक्षवेधक ठरला आहे. संस्कारक्षम मुल्य रूजविण्यासाठी त्रिकाल संध्या घेतली जाते. उठत बसत,हसत खेळत मैदानावर उपक्रमांतुन मनोरंजन करत हसतमुख गुरूजींची धडपड पालकांनाही उर्जा देते. विविधांगी स्पर्धांमध्ये यशस्वी होतात. विद्यार्थ्यांच्या आहार विहाराची काळजी घेत भाषिक व गणितीय खेळातुन बोध देतात. शनिवार दप्तराविना असला तरी स्पर्धात्मक खेळ पुरक ठरतात.सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्य मिळवून दिले आहे.

शाळेतील उपक्रम

चला करु इंग्रजीशी गट्टी, पाठातील क्यूआर कोड आधारित ई-लर्निंग, माझ्या आवडीची गणित गोष्ट, ॲक्शन वर्ड धावले मदतीला, तारीख निहाय गृहपाठ, मी परीक्षक, माझा आवडता डब्बा, दररोज घोषणा: दररोज वाचन, इंटेग्रल एज्युकेशन आधारित अध्यापन, मुलांच्या संकल्पनेतून खेळ करू शिकू, मीही गृहपाठ देतो, गणितीय जाळी जोडो ब्लॉक एकक व दशक दंडे हेच माझे मित्र

प्रतिक्रिया

गेल्या दहा वर्षांपासून या शाळेची गुणवत्ता सरस आहे. ग्रामस्थ व शिक्षक यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे.शिक्षण परिषदेत या शाळेचे उपक्रमांतुन अनेकांना उर्जा देतात.- बाळकृष्ण निकम.केंद्रप्रमुख, मळगाव ता.मालेगाव

शाळा हेच घर ही संकल्पना मांडत अध्यापनात सातत्य ठेवले.यापुर्वीच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.वातावरणासह मुलं आनंददायी शिक्षण घेतात.- संजय बेडसे, प्रयोगशील शिक्षक, निमगुले लहान.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT