AT-Patil-and-Raksha-Khadse
AT-Patil-and-Raksha-Khadse 
उत्तर महाराष्ट्र

खासदार खडसेंनी केली 723 कामे, पाटलांची 713

देविदास वाणी

जळगाव - जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांतील खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यामध्ये मतदारसंघात विकासकामे करण्यामध्ये चढाओढ आहे. खासदार खडसेंनी ७२३ कामे करून आघाडी घेतली आहे, तर खासदार पाटील यांनी ७१३ कामे करून अधिक कामे करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. एकूणच खासदार निधीतून कामे करणाऱ्यांमध्ये खासदारांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

खासदारांना दरवर्षी केंद्राकडून मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी पाच कोटींचा निधी मिळतो. आतापर्यंत खासदार पाटील यांना २७ कोटी ९३ लाख ५२ हजारांचा निधी विकास कामांसाठी मंजूर आहे. त्यांनी त्यातून ७१३ कामे मंजूर केली. त्यासाठी २५ कोटी ४६ लाख १२ हजारांचा निधी मंजूर आहे. त्यांना १६ कोटी ९० लाख ९५ हजारांचा निधी मिळाला आहे.  त्यांना ८ कोटी ६५ लाख १७ हजारांचा निधी अद्याप मिळालेला नाही. 

खासदार रक्षा खडसे यांना पाच वर्षात आतापर्यंत २७ कोटी ४ लाख ५९ हजारांचा निधी मंजूर झाला. त्यांनी ७२३ कामे सुचविली त्यांना २२ कामांसाठी २२ कोटी ४९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी १५ कोटी ६२ लाख ६८ लाखांचा निधी देण्यात आला आहे.  सहा कोटी ८७ लाखांचा निधी अद्याप त्यांना मिळालेला नाही. केंद्र शासन कामांसाठी निधी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविते. उपलब्ध निधी नुसार जिल्हा नियोजन समिती विकास कामांसाठी निधी खासदारांना देते. खासदार पद असेपर्यंत ते कामे सुचवू शकतात.

खासदारांसाठी जो निधी केंद्राकडून मंजूर होतो, तो जसजसा जिल्ह्याला मिळतो तसा तो वितरित होतो. खासदारपदावर असेपर्यंत कामे सुचवू शकतात. ती कामे मंजूर करावीच लागतात. यामुळे त्यांच्यासाठी मंजूर केलेला निधी लॅप्स होत नाही. 
- कौतिकराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी 

विकास कामांसाठी मिळालेला निधी शंभर टक्के खर्च केलेला आहे. शिक्षण, पाणीपुरवठा, युवकांसाठी व्यायामशाळा, अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांसाठी विविध प्रकारची विकासकामे केली आहेत. 
- ए. टी. पाटील, खासदार, जळगाव लोकसभा 

खासदार निधीतून स्थानिक पातळीवर नागरिकांच्या गरजा जाणून पायाभूत सुविधा दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक वाटप, वेगवेगळ्या समाजासाठी समाजमंदिर, युवकांना व्यायामशाळा, रस्ते, पाणी आदी सुविधा दिल्या. 
- रक्षा खडसे, खासदार, रावेर मतदारसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT