vaccination 
उत्तर महाराष्ट्र

दोंडाईचाः अजब प्रकार..मृत व्यक्तीला कोरोनाचा दुसरा डोस

कुटुंबाने मेसेज आल्याची लिंक ओपन केली असता दुसरा डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले असल्याचे दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा


दोंडाईचा : भारताने १०० कोटी लसीकरणाचा (Vaccination) टप्पा पार केल्याचा जल्लोष देशभर सुरू असताना या जल्लोषाला डाग लागला आहे, तो धुळे जिल्ह्यातील मालपूर गावात. ६ एप्रिलला मृत झालेल्या व्यक्तीला १९ ऑक्टोबरला दुसरा डोस दिल्याचे प्रमाणपत्र (Certificate) संबंधित यंत्रणेने पाठवून आपण कशाचा जल्लोष व अभिनंदन करीत आहोत, याचा प्रत्यय दिला.


मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बन्सीलाल सुका धनराळे (वय ६६) यांनी १० मार्चला कोव्हिशील्ड या लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यांचा ६ एप्रिलला मृत्यू झाला. त्या घटनेला तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेला. परंतु बन्सीलाल धनराळे यांच्या मोबाईलवर अचानक १९ ऑक्टोबरला कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला असल्याचा मेसेज आला. कुटुंबाने मेसेज आल्याची लिंक ओपन केली असता दुसरा डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले असल्याचे दिसून आले. हा प्रकार बघून कुटुंब अचंबित झाले त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क केला. मात्र कुणीही उत्तर देऊ शकले नाही. देशात शंभर कोटी डोस पूर्ण केल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असताना ही घटना समोर आली आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तींनाही आरोग्य विभाग कोरोनाचे लसीकरण करत असल्याने असे किती जणांची डोस दिल्याची नोंद केली गेली आहे, याचा शोध संबंधित विभागाने घ्यावा, अशी मागणीच (कै.) धनराळे यांचा मुलगा विनोद धनराळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT