dhule municipal corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे मनपातर्फे शहरात ‘रन फॉर वसुली’; मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसह जप्ती कारवाई

मालमत्ता करापोटी चालू मागणीसह तब्बल ७३ कोटी रुपये थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने अखेर महापालिकेची मोठी यंत्रणा कामाला लावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मालमत्ता करापोटी चालू मागणीसह तब्बल ७३ कोटी रुपये थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने अखेर महापालिकेची मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, वसुली/जप्ती पथकप्रमुख व कर्मचारी, मालमत्ता निरीक्षक, मालमत्ता कर लिपिक, मदतनीस, फीटर अशा सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांची फौज करवसुलीसह जप्ती कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिकेची मोठी यंत्रणा मराठा समाज सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त होती. त्यामुळे करवसुलीला ब्रेक लागला होता. (municipal administration has finally put big mechanism to work for recovery of arrears of Rs 73 crore dhule news)

त्यानंतर ‘रन फॉर धुळे’ अर्थात धुळे मॅरेथॉन-२०२४ साठीही अधिकारी, कर्मचारी कामाला होते. त्यामुळेही करवसुलीचे काम थंडावले. दरम्यान, महापालिकेच्या तिजोरीत असलेला खडखडाट व मोठ्या प्रमाणावर असलेली मालमत्ता कर थकबाकी तसेच मार्चअखेर या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने करवसुलीसाठी कंबर कसली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी गुरुवारी (ता. ८) अधिकाऱ्यांच्या बैठकीत करवसुलीसाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे, रन फॉर धुळे संपल्यानंतर आता रन फॉर वसुली सुरू करा, असे सांगितले होते.

त्यानुसार मार्च-२०२४ अखेर जास्तीत जास्त करवसुली व्हावी यासाठी मालमत्ता कर विभागासह इतर विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नियंत्रणात सात पथके नेमण्यात आली आहेत.

या पथकात सहाय्यक नियंत्रण अधिकारी, वसुली तथा जप्ती पथकप्रमुख, वसुली तथा जप्ती पथकातील कर्मचारी, मालमत्ता निरीक्षक, मालमत्ता कर लिपिक, मदतनीस, फीटर आदी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

अधिकाऱ्यांची नियुक्ती

सहाय्यक नियंत्रण अधिकारी म्हणून करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त हेमंत निकम, मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील, अभियंता कैलास शिंदे, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वसुली जप्ती पथकप्रमुख म्हणून कनिष्ठ अभियंता हेमंत पावटे, सहाय्यक अभियंता पी. डी. चव्हाण, सहाय्यक अभियंता सी. एम. उगले, कनिष्ठ अभियंता एन. के. बागूल, कनिष्ठ अभियंता कमलेश सोनवणे, मानधन कनिष्ठ अभियंता निखिल टकले, कनिष्ठ अभियंता प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वसुलीसह कारवाई

मालमत्ता कर २० हजारांवर व दहा हजारांवर पाणीपट्टी ज्यांच्याकडे बाकी आहे अशा थकबाकीदारांकडे भेटी देऊन थकबाकी वसूल करणे किंवा जप्ती कारवाई करण्याचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिले आहेत.

तसेच नियंत्रण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्ती करणे, नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT