उत्तर महाराष्ट्र

रस्ते दुरूस्त करा अन्यथा मनपाला टाळे ठोकू..मनसेचा इशारा ! 

रमाकांत घोडराज

धुळे ः वर्षभरापासून देवपूर भागातील जयहिंद हायस्कूल ते जयहिंद महाविद्यालय, वाडीभोकर रोड यांसह परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र, महापालिका या समस्येकडे कानाडोळा करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी जयहिंद चौकात निदर्शने केली. १५ दिवसांत रस्ते दुरुस्त झाले नाहीत, तर महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही मनसेने दिला. 

शहरातील देवपूर भागात जयहिंद हायस्कूल ते जयहिंद महाविद्यालय या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शाळा-महाविद्यालयाचा रस्ता असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. नेहरूनगर ते वाडीभोकर रस्ता, तसेच देवपूर भागातील अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये रस्त्यांची वाईट अवस्था आहे.

रस्त्यांचे काम संथगतीने

काही ठिकाणी दुरुस्तीचे काम संथगतीने होत आहे. अनेक ठिकाणी तर रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्षच आहे. महापालिका मात्र सुस्त असल्याचे मनसेने म्हटले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेप्रश्‍नी महापालिकेला जागे करण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गुरुवारी जयहिंद चौकात निदर्शने केली. महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यावर महापालिका प्रशासनातर्फे ओव्हरसिअर पी. डी. चव्हाण आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांना मनसेने निवेदन दिले. 

अन्यथा टाळे ठोकू 
दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसांत झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू, महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही मनसेने दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, रस्ते साधनसुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक संतोष मिस्तरी, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, रोहित नेरकर, विष्णू मासाळ, शहर उपाध्यक्ष राजेश दुसाने, अनिल खेमनार, नीलेश गुरव, साहिल खान, अविनाश देवरे, जगदीश गवळी, मदन पाटील, बापू ठाकूर, हरीश जगताप, अक्षय शिंदे, हेमंत हरणे, विजय चौधरी, अमृत पाटील, नरेश हिरे आदींनी हे आंदोलन केले.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT