Municipal team sealing the institution in the town hall. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 14 भाडेपट्टाधारक थकबाकीदारांना नोटीस; भाडेवसुलीसाठी तळोदा पालिका सरसावली

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : पालिकेच्या जागेवरील १४ भाडेपट्टाधारक व्यावसायिकांना पालिकेने नोटीस बजावली असून, पालिका मालकीच्या टाउनहॉल जागेवरील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेने कराराचे भाडे थकविल्याने त्या संस्थेच्या प्रवेशद्वाराला सील करण्यात आले आहे.

त्यामुळे पालिकेच्या थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, पालिका मालकीच्या जागेवरील गाळेधारक व जागेची भाडेपट्ट्याची थकबाकी भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.(Municipality notice to 14 leaseholders on municipal premises nandurbar news)

येथील पालिकेत नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याचे पाहून पालिकेच्या जागेवरील गाळेपट्टाधारक व्यावसायिकांना व थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

त्यात १४ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली असून, तातडीने भाडेपट्ट्याची थकबाकी भरण्याचे सूचित केले आहे.दुसरीकडे पालिकेच्या टाउनहॉलची जागा एका प्रतिष्ठित संस्थेला शाळा चालविण्यासाठी भाडेकरारावर देण्यात आली आहे. त्या संस्थेने भाडेपट्ट्याच्या थकबाकीची रक्कम न भरल्याने पालिका पथकाने मंगळवारी (ता. २१) सील केले.

त्यामुळे पालिकेने राबविलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली. मात्र पालिकेने केलेल्या या कारवाईचे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांनी स्वागत केले आहे. पालिका पथकात मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, वसुली लिपिक मोहन सूर्यवंशी, राजेंद्र माळी, आश्विन परदेशी, दीपक पाटील, आकाश हसे, नारायण चौधरी, जगदीश माळी, अजय वाघ, कढरे यांसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयाचे शहरात स्वागत

पालिकेत मुख्याधिकारीपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. तत्कालीन मुख्याधिकारी सपना वसावा यांची बदली झाल्यानंतर नंदुरबार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला होता. मात्र नियमित व कायमस्वरूपी मुख्याधिकारी पालिकेला मिळत नसल्याची परिस्थिती होती.

अखेर अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात १७ नोव्हेंबरला मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी पदभार स्वीकारला. त्यात तीनच दिवसांत थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे.

''शहरातील मालमत्ताधारकांनी व भाडेपट्टाधारक व्यावसायिकांनी कोणतीही कटू कारवाई टाळण्यासाठी पालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच भाडे भरून पालिकेला सहकार्य करावे.''-विक्रम जगदाळे, मुख्याधिकारी, तळोदा पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT