Status of water storage in Nakane Lake.
Status of water storage in Nakane Lake. esakal
उत्तर महाराष्ट्र

Water Crisis : नकाणे तलाव निम्म्यावर रिता; डेडरगाव तलावही निम्मा

सकाळ वृत्तसेवा

Water Crisis : शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव निम्म्यावर व डेडरगाव तलावातील पाणीसाठा निम्मा कमी झाला आहे. पावसाळ्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा असला तरी निसर्गाच्या लहरीपणा लक्षात घेता शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे. (Nakane lake half empty Dedargaon lake also half dhule news)

धुळे शहराच्या ६० टक्के भागाला तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. या योजनेवर पाणीसाठ्याची कमतरता नसते. यंदाही तशी स्थिती आहे. दरम्यान, ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलाव, डेडरगाव तलावातील पाणीही कमी झाले आहे.

नकाणे तलावातून रोज सुमारे एक एमसीएफटी पाणी घेतले जाते, तर डेडरगाव तलावातून ०.२५ एमसीएफटी पाणी घेतले जाते. नकाणे तलावाची पाणी साठवणक्षमता ३६० एमसीएफटी आहे. सद्यःस्थितीत हा पाणीसाठा ११७ एमसीएफटी आहे.

अर्थात एकूण क्षमतेच्या निम्म्यावर पाणीसाठा कमी झाला आहे. दुसरीकडे डेडरगाव तलावाची क्षमता १२० एमसीएफटी आहे. सद्यःस्थितीत तलावात ५९ एमसीएफटी पाणी शिल्लक आहे. या दोन्ही तलावातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेसा असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे असले तरी निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता पावसाने मोठी दांडी मारली तर समस्या उभी राहू शकते. त्यामुळे शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे. अर्थात शहरवासीयांना सध्या चार-पाच ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

त्यामुळे नागरिकांनी आणखी किती काटकसरीने पाणी वापरावे हाहा प्रश्‍नच आहे. जे नागरिक पाणीपुरवठ्यानंतर पाण्याची वारेमाप उधळपट्टी करतात, अर्थात वाहने धुणे, अंगणात पाणी मारणे, नळ उघडाच सोडणे आदी प्रकार मात्र थांबण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT