Officials while deciding cases in Shahada Lok Yataka. esakal
उत्तर महाराष्ट्र

Lok Adalat : शहादा लोकन्यायालयात 365 प्रकरणांचा निपटारा; अडिच कोटी रुपयांची वसुली

Nandurbar News : शहादा येथील लोक न्यायालयात ३६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडीअंती २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपयांची वसुली करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

शहादा : येथील लोक न्यायालयात ३६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडीअंती २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपयांची वसुली करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शहादा तालुका विधी सेवा प्राधिकरण व शहादा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे शनिवारी (ता. २७) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. (Lok Adalat)

यावेळी तालुका विधि सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. गुप्ता म्हणाले, लोकांचा वेळ व पैसा वाचावा म्हणून शासनामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर न्यायालयीन वाद-विवाद खटले आपापसात समजुतीने निकाली निघावे म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात येते. लोकांनी आपले वाद-विवाद.

खटले आपापसात समजुतीने मिटवून आपला वेळ व पैसा वाचवावा, जास्तीत जास्त खटले सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन करण्यात आले. लोक अदालतीमध्ये न्यायालयीन १०७५ प्रकरणे होती. दाखलपूर्व प्रकरणांत बँका व ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांची ४५८० अशी एकूण ५ हजार ६५५ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यापैकी न्यायालयीन-१३७ खटले, तर दाखलपूर्व २२८ खटले असे एकूण ३६५ खटले निकाली काढण्यात आले. त्यातून २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपयांची वसुली करण्यात आली. यासाठी चार पॅनलची नेमणूक करण्यात आली होती. (latest marathi news)

यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांच्यासोबत ॲड. एम. एस. साळवे, दिवाणी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश यू. एन. पाटील, ॲड. बी. पी. शिंदे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. व्ही. निवघेकर, ॲड. सी. डी. भंडारी.

न्यायमूर्ती श्रीमती एस. आर. पाटील, ॲड. आर. एम. सोनवणे यांचे एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अधीक्षक विनायक पाडवी, सहाय्यक अधीक्षक एस. व्ही. जवंजलकर, वरिष्ठ लिपिक विलास सूर्यवंशी, किशोर ठाकुर, स्टेनो एम. टी. घुगे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai IndiGo Plane: मुंबई विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणादरम्यान रनवेवर विमान घसरले अन्...; गोंधळाचे वातावरण

Kidney Donate : अंगणवाडी मदतनीस आईने दिली मुलीला किडनी; ‘ससून’मध्ये झाले प्रत्यारोपण

Latest Maharashtra News Updates : येरमाळा महसूल मंडळात गुरुवारी रात्री अतिवृष्टी

Ajit Pawar, Sharad Pawar ना धक्का देणार? Beed मध्ये मोठा डाव टाकण्याच्या तयारीत | Sakal K1

धक्कादायक! अभिनेत्री तेजस्वीनी पंडितच्या आईचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT