Hostel  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया

Nandurbar : मागासवर्गीय मुला व मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण, सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी कळविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक नंदुरबार कार्यालयाच्या अधीनस्त असलेल्या मागासवर्गीय मुला व मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण, सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी कळविली आहे. (Nandurbar Admission Procedure in Backward Class Government Hostels starts)

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या इमाव, विजाभज, विमाप्र, अनाथ, दिव्यांग, आ.दु.घ. प्रवर्गानिहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, तद्‍नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया दोन वसतिगृहांमध्ये सुरू आहे.वसतिगृह प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, दरमहा निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्यासाठी भोजनभत्ता डीबीटी रक्कम, गणवेश ड्रेसकोड रक्कम इत्यादी व इतर आनुषंगिक सोयी-सुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरविण्यात येतील.

ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नंदुरबार येथून अर्ज प्राप्त करून आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित वेळेत सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय

टाळण्यासाठी आपले प्रवेश अर्ज विहित वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह संबंधित वसतिगृहातच सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृह तसेच संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कार्यालय, सामाजिक न्यायभवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही श्री. वसावे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT