Contractual electricity workers participation in statewide strike by Maharashtra State Electricity Company Contractual Workers Union Action Committee. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे आंदोलन सुरू

Nandurbar : महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटना कृती समिती २०२४ चे राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटना कृती समिती २०२४ चे राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी शहादा, तळोदा, अक्कलकुवा, खापर, धडगाव येथे कामबंद केले आहे.

जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर कामगार काम करत आहेत. (Nandurbar Agitation started by Outsourced Electricity Contract Workers Union)

राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंत्राटी कामगारांनी आजपर्यंत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांना अनेक वर्षांत अनेक निवेदने सादर केली. प्रत्यक्ष पत्रव्यवहार केला, तसेच विविध प्रकारची आंदोलने मंत्रालय व आझाद मैदान तसेच वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर केली.

मात्र त्याचा शासनावर कोणताही परिणाम झाला नाही. राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे ४२ हजार वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील ३० प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे.

प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून सात वर्षे शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा, नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन सेवेत सामावून घ्यावे, ३० टक्के पूर्वक भत्ता मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

यासाठी विविध संघटनांचे सुमारे ४२ हजार वीज कंत्राटी कामगार राज्यभरात आंदोलन करीत आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १६ फेब्रुवारीला कामगार आयुक्तांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, २१ फेब्रुवारीला विभागीय कार्यालयात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, २८ व २९ फेब्रुवारीला कामबंद आंदोलन करण्यात आले आहे.

तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ५ तारखेपासून संपूर्ण राज्यातील ३० संघटनांतील ४२ हजार कर्मचारी बेमुदत उपोषणास बसतील. शहादा महावितरण कार्यालयासमोर बुधवारी मध्यरात्रीपासून बसले आहेत. संपूर्ण परिसर अंधारमय होईल व यास सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील, असे केंद्रीय सरचिटणीस महाराष्ट्र बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना (इंटक) केंद्रीय सरचिटणीस रामचंद्र रामोळे यांनी सांगितले.

सदर करीम खाटीक जळगाव झोन अध्यक्ष, जळगाव झोन सरचिटणीस, संदीप धनगर, नंदुरबार सर्कल अध्यक्ष खुशाल जाधव, नंदुरबार सर्कल सरचिटणीस प्रल्हाद कोळी, नंदुरबार सर्कल उपाध्यक्ष भरत पाटील, नंदुरबार सर्कल खजिनदार दिनेश सामुद्रे, नंदुरबार सर्कल उपसरचिटणीस गणेश साळी, रोहित राजपूत व विशाल पाटी, जुनेद अल्ली आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT