Lok Sabha Election 2024  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 173 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Nandurbar : निवडणूक आयोगामार्फत १६ मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असून, आदर्श आचारसंहिताही जिल्ह्यात लागू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : निवडणूक आयोगामार्फत १६ मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असून, आदर्श आचारसंहिताही जिल्ह्यात लागू झाली आहे. त्याअनुषंगाने (अ.ज.) नदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या विधानसभा मतदारसंघांत १७३ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या अशी अक्कलकुवा ५७, शहादा ४१, नंदुरबार ३९, नवापूर ३६. (Nandurbar Appointment of 173 Zonal Officer in Nandurbar Lok Sabha Constituency)

नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे बुधवारी (ता. २७) सकाळी अकराला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी हरीश भामरे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार, कर्तव्य व जबाबदारीबाबत प्रशिक्षण दिले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार प्रदीप पवार यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामकाजाबाबत प्रशिक्षण दिले. (latest marathi news)

प्रशिक्षणास मनीषा खत्री यांनी पूर्णवेळ सहभाग घेऊन दुपारी दीडला सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मतदान यंत्राबाबतचे प्रशिक्षण दिले. त्यात त्यांनी सहभाग घेतला.

प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक महामुनी, नतिशा माधुर (अक्कलकुवा), सुभाष दळवी (शहादा), गणेश मिरगळ (नवापूर), नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, अक्राणीचे तहसीलदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT