Assembly Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Assembly Constituency : धडगाव तालुक्याची साथ विकासाला की गावाकडील उमेदवाराला?

Assembly Constituency : धडगाव तालुका नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येत आहेत.

धनराज माळी

Nandurbar Assembly Constituency : धडगाव तालुका नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येत आहेत. मात्र येथे भाजपनेही मुसंडी मारली आहे. सत्तेतील भाजपचे मंत्री, खासदारांनी येथील अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून रोजगार, महिला विकास साधण्याच्या प्रयत्नासोबतच रस्ते, पाणी, घरे, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधाही उपलब्ध करण्याचा प्रयत्न झाला आहे. (Dhadgaon taluka support for Vikas or candidate from village )

मात्र यंदाच्या निवडणुकीत लोकसभेसाठी याच परिसरातील तरुण, सुशिक्षित उमेदवार निवडणूक रिंगणात होता. त्यामुळे आपला घरचा उमेदवार म्हणून पारंपरिक काँग्रेसच्या मतदाराने ॲड. गोवाल पाडवी यांना साथ दिली, की विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या डॉ. हीना गावित यांना पाठिंबा दिला, याबाबत आज सांगणे कठीण आहे. त्यामुळे सध्या तालुक्याच्या मतदारांची साथ कोणाला मिळते, याच प्रश्‍नावर चर्चा रंगू लागली आहे. धडगाव हा सातपुड्याच्या कुशीतील डोंगरदऱ्यात वसलेला तालुका आहे.

यालाच अतिदुर्गम भाग म्हणून ओळखतात. या अतिदुर्गम भागाचा नावलौकिक कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूच्या घटनांनी सर्वदूर झाला आहे. शासन-प्रशासन व राजकीय पटलावर अविकसित, समस्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा धडगाव तालुका आता रंगविला जाणारा अत्यंत अविकसित, आदिवासी गोरगरिबांचे दयनीय चित्र, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वाहतूक समस्यांचे भकास चित्राप्रमाणे आज तरी हा तालुका राहिलेला नाही.

कारण येथे गेली ४० वर्षे काँग्रेसचे आमदार म्हणून ॲड. के. सी. पाडवी नेतृत्व करीत आहेत. त्यांना मानणारा मतदार आहे. तसेच काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निष्ठा असलेला काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. असे असले तरी या भागात शासनाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून तर खासदार म्हणून डॉ. हीना गावित यांनी केंद्र शासनाच्या घरकुल, उज्ज्वला गॅस, दुधाळ गायीवाटप यांसह रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. (latest political news)

ते कोणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळे शासनदरबारी रंगवलेले भकास, अविकसित तालुक्याचे चित्र आजच्या घडीला नक्कीच पालटले आहे. त्यामुळे येथील मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार असला तरी विकासाला चालना देणारे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी डॉ. सुप्रिया गावित यांनी प्रयत्न केले.

त्यांना भविष्यातील तालुक्याच्या विकासासाठी बळ देणारे मतदान झाले की, सातपुड्याच्या कुशीतील तरुण तथा काँग्रेसचा उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हा आपल्या गावाकडचा, घरचा व सातपुड्याचा असल्याने त्यांना खासदारकीची संधी मिळावी म्हणून मतदान केले, हे आज तरी सांगणे कठीण आहे. सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार येथील पारंपरिक काँग्रेसच्या मतदाराने काँग्रेसलाच मतदानातून झुकते माप दिले असल्याचा दावा केला जात आहे.

त्यात ‘प्लस पॉइंट’ म्हणजे कोणीही व्यक्ती गावाचा, घरचा आणि समाजाच्या व्यक्तीला विरोध करून दुसऱ्या तालुक्याच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही. त्यांनी शासनाच्या योजना राबवून विकासाला हातभार लावला असला तरी गोवाल पाडवी विजयी झाले, तर सातपुड्याचे नाव दिल्लीदरबारी पोचणार आहे. त्याचाही सार्थ अभिमान येथील मतदार बाळगू लागले आहेत.

त्यामुळे दोन्ही पक्षांकडून येथे झालेल्या मतदानावर दावे-प्रतिदावे करीत असले तरी धडगाव तालुक्यातील काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची अखेर साथ कोणाला, हा प्रश्‍न आजतरी अनुत्तरितच आहे. त्याचे उत्तर ४ जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल, तेव्हाच ठरेल धडगावच्या पारंपरिक मतदाराची साथ विकासाला की गावाकडील माणसाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT