Bogus Call Center esakal
उत्तर महाराष्ट्र

Bogus Call Center Fraud : फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड!

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : बोगस कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश येथील स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. त्यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिन्ही भामटे गुजरातमधील असून सध्या राजमोही (ता.अक्कलकुवा) येथून ते बोगस कॉल सेंटर चालवित होते. (Nandurbar Bogus Call Center Fraudulent interstate gang arrested nandurbar crime news)

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार मोठी राजमोही (ता. अक्कलकुवा) गावात जावेद निजामोद्दीन मक्राणी यांच्या घरी सुरत येथून आलेले काही तरुण राहात असून ते इन्स्टाग्रामवर व्हीआयपी मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले.

ग्राहकांना आमिष दाखवून त्यांचेकडून फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा इतर माध्यमातून पैसे घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे व्हीआयपी मोबाईल नंबर न देता त्यांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाऊन बोलाविले. पथकाने यासीन रईस मक्राणी (१९ रा. सुरत), एजाज तमीजोद्दीन मक्राणी (२५, रा.मोठी राजमोही ता. अक्कलकुवा), यशराज विजयसिंह महिदा (२५ सुरत) यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

पाच विविध कंपनीचे महागडे मोबाईल, सीमकार्ड, डेबिट कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले. त्यांनी तपासात ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची कबुली दिली. गत सहा महिन्यात कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, पंजाब आदी राज्यांमधील नागरिकांची व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितले.

"नागरिकांनो, ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, अनोळखी व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये किंवा पेटीएमद्वारे खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. किंवा अशा प्रकारचे कॉल आल्यास किंवा फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा." - पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT