A motorcyclist during a fatal journey on Karde-Malda road. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बोरद, करडे-मालदा रस्त्याच्या कामाला दिरंगाई; नागरिकांची प्रवासासाठी तारेवरची कसरत

Nandurbar : बोरदपासून करडे ते मालदा रस्ता साधारणतः सात किलोमीटरचा असल्याने त्याच्या दर्जोन्नतीसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बोरद : बोरदपासून करडे ते मालदा रस्ता साधारणतः सात किलोमीटरचा असल्याने त्याच्या दर्जोन्नतीसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असून, या रस्त्याच्या कामाला पाहिजे तेवढी प्रगती नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Nandurbar Borad Karde Malda road work delayed due to which citizens are struggling to travel)

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत बोरद ते करडे-मालदा रस्ता साधारणतः सात किलोमीटरचा असून, या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत दोन कोटी ९६ लाखांचा अंदाजित निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा मंजुरी आदेश २० सप्टेंबर २०२३ ला पारित झाला असून, ठेकेदाराची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. ठेकेदाराकरवी प्रत्यक्ष कामाला सुरवातदेखील करण्यात आली आहे.

या रस्त्याला दोन मोऱ्यांचे काम असून, काही ठिकाणी काँक्रिटीकरणदेखील आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी मुरूम व खडी असे साहित्य रस्त्याच्या कडेला आणून ठेवले आहे. खडी रस्त्यावर अंथरण्यात आली असून, काही ठिकाणी आहे त्याच अवस्थेत ती गेल्या दोन महिन्यांपासून पडून आहे. त्यामुळे मालदाकडून बोरद गावी येणारे प्रवासी त्याचबरोबर परत आपल्या गावी जाणारे प्रवासी यांना या रस्त्यामुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

बेमुदत उपोषणाचा इशारा

राज्य परिवहन महामंडळातर्फे या ठिकाणी बस सुरू असून, अनेक वेळा बस पंक्चर झाल्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. बसचे कर्मचारी वेळोवेळी आपल्या आगाराला या संदर्भात तक्रार नोंदवीत आहेत व बस बंद करण्याची मागणी करत आहेत; परंतु असे असले तरी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या मार्गावरून बस धावत आहे.

अनेक वेळा बस रस्त्याच्या कडेला अडकून पडल्याची घटनादेखील घडली आहे. काही प्रवाशांची वाहने ही खडीकरणामुळे उलटली असून, अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे लोकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने हे काम पूर्ण करण्यात आले नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारादेखील नागरिकांकडून देण्यात आले आहे. (latest marathi news)

"या रस्त्याबाबत माझ्या गावातील नागरिक, तसेच माझ्या ग्रामपंचायतीला जोडून असलेल्या नागरिकांनी आपले म्हणणे माझ्यासमोर मांडले आहे. मी संबंधित ठेकेदाराला या संदर्भात बोललो आहे. त्याचबरोबर संबंधित विभागाशीदेखील या संदर्भात बोललो आहे. त्यांनी लवकरात लवकर काम सुरू करण्याचा शब्द दिला आहे."-गोपी पावरा, सामाजिक कार्यकर्ता, मालदा, ता. तळोदा

"पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत विविध टप्प्यांसाठी निधी दिला जात असतो. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला झालेल्या कामाबद्दल आमच्या विभागाला माहिती सादर करावी लागते. ती माहिती दिल्लीपर्यंत पोचवावी लागते. त्याअंतर्गत विभागाकडून त्या कामाची पाहणी केली जाते. पुढील कामासाठी मंजुरी देण्यात येत असते.

त्यामुळे ठेकेदाराने सुरवातीच्या कामाची माहिती उशिरा दिल्याने त्या संदर्भात पंतप्रधानांच्या विभागाकडून याला मंजुरी येण्यास उशीर झाला. आता पुढील कामासाठी मंजुरी प्राप्त झालेली असून, ठेकेदाराला काम पुढे चालू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. या संदर्भात आमच्या विभागाकडून काळजी घेतली जात आहे." -भूषण भामरे, कनिष्ठ अभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना विभाग, नंदुरबार

"पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामांबाबत योग्य ती माहिती वेळोवेळी संबंधित कार्यालयाला सादर करावी लागते. तांत्रिक बाबीमुळे या कामास थोडा उशीर होतो, तसेच आपल्या परिसरामध्ये विविध सण, उत्सव आल्यामुळे मजुरांची उपलब्धता होऊ शकली नाही. त्यामुळे या कामाला उशीर झाला आहे. आता कामाला सुरवात झाली असून, परिसरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही याकडे मी जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर कामाला पूर्णत्व देईन."-नवनीत शिंदे, ठेकेदार, पंतप्रधान ग्राम सडक योजना, बोरद, करडे-मालदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT