Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : गोवंशाच्या सुटकेसाठी पोलिसांची धडक कारवाई; नंदुरबारमधील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar Crime : शहरातील कुरेशी मोहल्ला येथून नंदुरबार शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने ६४ हजार रुपये किमतीच्या १८ गोवंशाची सुटका करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : शहरातील कुरेशी मोहल्ला येथून नंदुरबार शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने ६४ हजार रुपये किमतीच्या १८ गोवंशाची सुटका करण्यात आली. या प्रकरणी मालकांवर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याच्या प्रतिबंध अधिनियामान्वये कारवाई करण्यात आली. (Nandurbar city police and local crime branch joint operation rescued 18 cattle worth Rs 64 thousand)

नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वासुदेव देसले व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी किरणकुमार खेडकर यांनी पथकासह शहरातील कुरेशी मोहल्ला येथे जाऊन खात्री केली असता तेथील बिस्मिल्ला चौकासमोरील रस्त्यावर, लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये, बोळीमध्ये व एका घरामध्ये अशा विविध ठिकाणी १८ गोवंश आढळली.

त्यांचे मालक इरफान शेख मदरान कुरेशी, सईद हाजी शेख छोटू, जाविद युसूफ कुरेशी, जाकिर शेख सुभान, (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) यांनी गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना वेदना होईल अशा पद्धतीने निर्दयपणे बांधलेल्या स्थितीत मिळाली. ही जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत पंचनामा केला.

६४ हजार रुपये किमतीच्या या जनावरांना तालुक्यातील चौपाळे येथील अरिहंत गोशाळा व पांजरपोळ येथे दाखल केले. या प्रकरणी गोवंश जनावरांच्या मालकांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे नोंदविले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या आदेशान्वये व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव देसले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, नंदा पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, युनूस शेख तसेच गुन्हे शोधपथकाचे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT