arrested esakal
उत्तर महाराष्ट्र

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकास अटक

धनराज माळी

नंदुरबार : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्‌स ठेवून समाजातील भावना दुखाविणाऱ्या युवकास नंदुरबार शहर पोलिसांच्या पथकाने अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे स्टेट्‌स ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.

बुधवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास नंदुरबार शहरात राहणारा गणराज एअरटेल नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲपवर धार्मिक भावना दुखावल्या जाऊन, धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कारवाईचे आदेश दिले.

त्यावरून नंदुरबार शहर ठाण्याच्या पोलिस अंमलदारांनी शोध घेऊन त्या व्यक्तीस गुरूकुलनगर परिसरातून ताब्यात घेतले. त्याचे नाव गजानन ऊर्फ गणराज भास्कर कुवर (वय २०) असे आहे. त्याचा मोबाईल जप्त करुन त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व त्यास अटक करण्यात आली. त्याची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे.

फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या, दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करू नये. त्याबाबत सोशल मीडियावर स्टेट्‌स ठेवू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट प्रसारित करताना कोणीही आढळून आल्यास गय केली जाणार नाही.

-पी . आर . पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

अभिमानास्पद! चांद्रयान-३ ला मिळाला AIAA गॉडर्ड एस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड; दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून रचला इतिहास

Gutkha Seizure: आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येणारा २७ लाखांचा गुटखा इस्लापूरजवळ जप्त; एक तस्कर अटकेत

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

SCROLL FOR NEXT