Nandurbar CMO M Sawan Kuma 179 children died in the civil hospital in the last three months  
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : गेल्या तीन महिन्यांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 179 मुलांचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

रोहित कणसे

राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदूरबार येथे मागील तीन महिन्यांच्या कालावधीत सिव्हील हॉस्पीटलमध्ये 179 मुलांचा मृत्यू झाला असून नंदुरबारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) एम सावन कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सीएमओ सावन कुमार यांनी सांगितलं की, जुलैमध्ये 75 मृत्यू, ऑगस्टमध्ये 86 मृत्यू आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत 18 बालमृत्यू नंदुरबार जिल्ह्यात झाले आहेत. तसेच त्यांनी सांगितले की या मृत्यूची प्रमुख कारणे कमी वजन, जन्माच्या वेळीस श्वासोच्छवासात अडचण येणे, सेप्सिस आणि श्वसनाचे आजार आहेत. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे 0-28 दिवसांच्या मुलांचे असून जवळपास 70 टक्के मृत्यू या वयोगटातील आहेत.

इतके मृत्यू का होतात?

सावन कुमार यांनी पुढे बोलताना सांगितले की, 60 टक्के मृत्यू हे दोन तालुक्यात होतात. अक्कलकुवा आणि धडगाव. कारण येथे अशी काही गावे आहेत जेथे बाराही महिने संपर्कात राहात नाहीत. रोड नसल्याने रुग्णवाहीका पोहचून शकत नाहीत आणि नेटवर्क कनेक्टीव्हिटी देखील नसल्याने रुग्णांची माहिती देखील उशीरा कळते. यामुळे मृत्यूचे प्रणाण अधिक आहेत. अनेक स्त्रियांना येथे सिकलसेल असतात ज्यामुळे प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होते. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही 'लक्ष्य 84 डेज' मिशन सुरू केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT