Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : बालिकेचा विनयभंग प्रकरणी आरोपीस; 12 वर्षे एक महिना कारावासाची शिक्षा

Nandurbar Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी बारा वर्षे व एक महिना कारावासाची आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी बारा वर्षे व एक महिना कारावासाची आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. धडगाव पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन पिडीतेस आरोपी पंकज आमदा पावरा (वय ३२, रा. बोरवण ता.धडगाव जि. नंदुरबार) याने वेळोवेळी पाठलाग करीत १४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी विहिरीवरून पाणी घेऊन येत असताना तिचा विनयभंग केला होता. (Nandurbar Crime)

याप्रकरणी आरोपी पंकज याच्याविरुद्ध धडगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविला होता. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. पोलिस उपनिरीक्षक एस.व्ही.दहिफळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. श्री. दहिफळे यांनी सखोल तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सी.एस.दातीर यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित युवती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पीडित बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

यावरुन आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अति. सत्र न्यायाधीश, शहादा यांनी आरोपी पंकज पावरा यास १२ वर्ष एक महिना कारावासाची व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वाय.बी.मोरे यांनी काम पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे, परशुराम कोकणी देविदास सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT