Bribe Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : कृषी अधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

Bribe Crime : मंजूर शेततळे अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी वीस हजाराची लाच घेतांना नवापूर मंडळ कृषी अधिकारी सागर अहिरे यास रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Bribe Crime : मंजूर शेततळे अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी वीस हजाराची लाच घेतांना नवापूर मंडळ कृषी अधिकारी सागर अहिरे यास रंगेहाथ पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या बाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थुवा ( ता. नवापूर ) येथे तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती. (Agriculture officer caught taking bribe )

सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी नवापूर मंडळ कृषी अधिकारी सागर अशोक अहिरे (वय ३३) यांनी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांच्याकडून २० फेब्रुवारी २०२४ रोजी २५ हजाराच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती वीस हजार देण्याचे कबूल केले. सागर अहिरे यांनी पंचांसमक्ष वीस हजार लाचेची रक्कम घेतली. म्हणून सागर अहिरे यांचे विरुद्ध नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पडताळणी कार्यवाही पथक पोलीस हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, देवराम गावित, पोलीस नाईक हेमंतकुमार महाले, सुभाष पावरा या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SCROLL FOR NEXT