Eicher truck brought to Tehsil office. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : तळोद्यात गहू-तांदळाचा काळाबाजार; वाहनासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Crime : तालुक्यातील कोठार रस्त्यावर धडगावकडून गहू, तांदूळ भरून येणारा आयशर ट्रक रविवारी (ता. १७) पकडण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : तालुक्यातील कोठार रस्त्यावर धडगावकडून गहू, तांदूळ भरून येणारा आयशर ट्रक रविवारी (ता. १७) पकडण्यात आला. ट्रकचालकाकडे संबंधित मालाची विचारपूस केली असता त्याकडे कुठलेही धान्य बिल आढळून न आल्याने काळ्या बाजाराची वाहतूक करत असल्याने आयशर ट्रकसह नऊ लाख ६१ हजार ४५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून तळोदा पोलिस ठाण्यात आणण्यात आला. (Nandurbar Crime Black market of wheat and rice in Taloda)

आयशर ट्रक (एमएच १५, डीके १४९७)मध्ये ७३ हजार ७०० रुपये किमतीचा ६७ कट्टे ३३.५० किलो वजन असलेला गहू व ८७ हजार ७५० रुपये किमतीचा ६५ कट्टे ३२.५० किलो वजन असलेला तांदूळ, आठ लाख रुपयांचा आयशर असा नऊ लाख ६१ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात चालक भिका गुलाबसिंग ठाकरे (रा. निगदी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) तसेच चालकाचा मदतनीस आकाश दिलीप ढोले (रा. वडफड्या, ता. धडगाव, जि. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. (latest marathi news)

हा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना कोठार गावाच्या रस्त्याच्या उतारावर धडगाव-तळोदा रस्त्यावर मिळून आला. गहू, तांदूळ नेमका कोणत्या ठिकाणी काळ्या बाजारात जाणार होता.

यात मुख्य म्होरक्या कोण, त्याचे भागीदार अजून कोण, असे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप करीत आहेत. यात मोठे मासे गळाला लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ तुळजापूरमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटला

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT