Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : नंदूरबार पोलिसांतर्फे अजामीनपात्र 44 संशयितांना अटक

Nandurbar Crime : लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्याकडून जिल्ह्यातील काही संशयित यांना समन्स बजाविली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पोलिस ठाण्यात चालू असलेल्या विविध केसेसमधील संशयित यांना समन्स बजावणीची मोहीम सुरु असताना पोलिस ठाण्यातर्फे अजामीनपात्र वॉरंटमधील एकूण ४४ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये न्यायालयाने यापूर्वी समन्स काढले होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्याकडून जिल्ह्यातील काही संशयित यांना समन्स बजाविली जात आहे.

यात काही संशयित यांना समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. जामीनपात्र वॉरंटची देखील बजावणी पोलिस ठाण्यांमार्फतीने करण्यात आली होती.

परंतु जामीनपात्र वॉरंट काढूनही काही लोक गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाचे आदेशान्वये एकूण ४४ जणांना विविध पोलिस ठाण्यांमार्फतीने अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी, संजय महाजन.

उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, दत्ता पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस ठाणे कर्मचाऱ्यांनी केली.

"न्यायालयामध्ये आपल्या चालू असलेल्या केसेस बाबत समन्स, जामीनपात्र वॉरंटमध्ये वेळोवेळी हजर राहून न्यायालयातून वॉरंट रद्द करून घ्यावे, जेणेकरून अजामीनपात्र वॉरंटमुळे होणारी अटकेची कारवाई टाळता येईल. तसेच यापुढेदेखील अशा प्रकारची कारवाई जिल्हा पोलिस दलातर्फे सुरु राहील." - श्रवण दत्त एस. पोलिस अधीक्षक, नंदूरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT