Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : क्रीडा क्लबच्या नावाखाली जुगार! पोलिसांकडून पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Crime : शहरातील एका इमारतीत क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (ता. ८) रात्री छापा टाकून पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : शहरातील एका इमारतीत क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (ता. ८) रात्री छापा टाकून पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू असून, सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. (sports club gambling police seized goods worth fifty seven lakhs )

शहरातील परदेशीपुरा परिसरातील नवीन पालिकेच्या मागील क्रीडा भवन क्लब येथे संदीप अरुण चौधरी ५२ पत्त्यांच्या विविध कॅटचा वापर करून २७ पत्ती नावाचा खेळ पैसे लावून खेळवत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणी मुख्य संशयित क्रीडा मंडळचालक संदीप चौधरी (रा. देसाईपुरा, नंदुरबार) याच्यासह ३७ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

त्यांच्यावर नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, दारू बाळगण्याचा परवाना नसतानाही क्रीडा मंडळात मद्यपान केल्याने परशुराम दशरथ पाडवी (रा. नारायणपूर) व इफ्तेखार शेख कासम पिंजारी (रा. एम. के. नगर, कोरीट नाका, नंदुरबार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून सहा लाख ७२ हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर शहरालगत कंदलगाव तलाव परिसरात ९० फूट उंचीची चार झाडे तोडताना सहा जणांना पकडले

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT