Thieves looted the goods by breaking the glass of the same vehicle. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : पर्यटकांच्या वाहनाची काच फोडून मुद्देमाल लंपास; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; वाल्हेरी धबधब्यावरील घटना

Crime News : या प्रकारामुळे वाल्हेरी येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तळोद्यातील पर्यटकांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीतून रोकडसह १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी घडली. दरम्यान, या प्रकारामुळे वाल्हेरी येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Nandurbar Crime Tourists vehicles broken looted)

तळोदा तालुक्यातील वाल्हेरी येथे धबधबा असून, या ठिकाणी पावसाळ्यात तळोदा शहरासह तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील पर्यटक, हौशी नागरिक मोठ्या संख्येने येतात. सध्या तळोद्यात तसेच परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे वाल्हेरी येथील धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

दरम्यान, तळोद्यातील धर्मराज पवार, आदिल शेख, संदीप परदेशी, दीपक परदेशी आदी त्यांच्या खासगी कारने बुधवारी (ता. २४) दुपारी दोनच्या सुमारास वाल्हेरी येथील प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी गेले होते. धबधब्यापासून लांब अंतरावर कार उभी करून ते धबधब्याजवळ गेले होते. त्यांनी कारमध्ये आपल्या जवळील सुमारे बारा हजार रुपये तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील कारमध्ये ठेवल्या आणि कार लॉक करून धबधबा पाहण्यासाठी गेले.

साधारणत: दोन तासांनंतर धबधबा पाहून कारजवळ आल्यावर, कुणीतरी आपल्या कारच्या पुढच्या सिटाजवळील उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा मोठ्या दगडाने फोडलेला त्यांना आढळल्या. त्यांनी कारमधील रोकड व वस्तूंची पाहणी केली असता त्यांना त्या चोरीला गेल्याचे लक्षात आले.

दरम्यान, या प्रकारामुळे वाल्हेरी पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट वाढल्याचेदेखील बोलले जात आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (latest marathi news)

मद्यपींचाही वाढता उपद्रव

तळोदा तालुक्यातील वाल्हेरी येथील फेसाळणारे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातील पर्यटकदेखील या ठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा आनंद लुटतात. मात्र या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर मद्यपींचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी व रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी उसळत असून, टवाळखोरांची संख्यादेखील यात मोठी असल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी येऊन मद्यपान करणे व धिंगाणा घालण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. महिला पर्यटकांनादेखील त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य पाण्याच्या प्रवाहात स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या ठिकाणी वाढलेल्या मद्यपी, टवाळखोर व चोरांच्या उपद्रवामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

"दर वर्षी पावसाळ्यात वाल्हेरी येथील धबधबा पाहण्यासाठी तळोदा तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र या ठिकाणी वन विभाग अथवा पोलिस खात्याकडून योग्य बंदोबस्त होणे आवश्यक आहे."- संदीप परदेशी, राष्ट्रवादी, युवा अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT