chemical fertillizer chemical fertillizer
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात रासायनिक खतांचा २३ हजार मेट्रिक टन पुरवठा

पूर्ण हंगामात लागणारा युरिया खरेदी न करता पिकाच्या गरजेनुसार व वाढीच्या आवश्यकतेनुसार खरेदी करावा.

धनराज माळी


नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यास खरीप हंगाम (Kharif season) २०२१ करिता एकूण ९६ हजार २० मेट्रिक टन रासायनिक खतांचे (chemical fertillizer) आवंटन मजूर करण्यात आले असून त्यांपैकी २३ हजार ३४२ मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
(nandurbar district twenty three thousand chemical fertillizer supply)

नंदुरबार जिल्ह्यासाठी खरीप हंगामात एकूण खतांपैकी युरिया खताचे ४५ हजार ५९० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले असून आज अखेर ९ हजार ६०४ मे.टन युरिया प्राप्त झाला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने मंजूर आवंटनाप्रमाणे खत प्राप्त होईल.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी (Farmers) मागील हंगामातील शिल्लक व चालू हंगामातील प्राप्त असे एकूण जवळपास १२ हजार ९४१ मे.टन युरिया खताची खरेदी केली आहे. शेतकरी बांधवांनी एकाच वेळी पूर्ण हंगामात लागणारा युरिया खरेदी न करता पिकाच्या गरजेनुसार व वाढीच्या आवश्यकतेनुसार खरेदी करावा. अनावश्यक साठा करू नये, जेणेकरून सर्वांना खत उपलब्ध होईल व तुटवडा जाणवणार नाही.

fertillizer

आधारकार्ड दाखवून मिळणार खत
शेतकरी बांधवांनी खत खरेदी करतेवेळी आधार कार्ड घेऊन जावे. शेतकऱ्यांनी खताच्या एकाच ग्रेडचा आग्रह न धरता उपलब्ध असलेल्या खतामधून आपली गरज भागवावी. पिकांना फक्त युरिया खताचीच आवश्यकता नसून इतरही घटक पिकांच्या वाढीसाठी व उत्पादन वाढीसाठी आवश्यक असतात हे विचारात घेऊन युरियासोबत कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक खताचा प्रमाणात वापर करावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT