MP Manikrao Gavit
MP Manikrao Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha constituency : गावितांच्या रूपाने नंदुरबारला प्रथमच गृहराज्यमंत्रीपदाचा मान

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Lok Sabha constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सतत नऊ वेळा विक्रमी मताधिक्याने निवडणून येत विक्रम घडविणारे दिवंगत खासदार माणिकराव गावित यांची देशातील राजकिय पटलावरील कारकिर्द इतिहासात नोंद होण्यासारखी आहे. स्वपक्षीयच नव्हे, तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही ज्यांचावर विश्‍वास होता.

असे अविरत ३५ वर्षे नंदुरबारचे नाव संसदेत झळकावणारे हे ‘माणिक’ नंदुरबारच्या राजकिय इतिहासात अमर झाले आहे. त्यांच्या रूपाने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला या देशाचे गृहराज्यमंत्री पद व संसदेचे हंगामी अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला.

१९८० पासून सतत नऊवेळा अर्थात तीनदा हॅटट्रीक करणारे स्व. माणिकराव गावित यांच्यावर २००४ च्या लोकसभेचा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांनी विश्‍वास दर्शवित केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदाची धुरा सोपविली. नंदुरबारसाऱख्या आदिवासी जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळणे म्हणजे देशातील राजकीय नेत्यांसाठी आश्‍चर्याचा धक्काच होता.

मात्र ते केवळ अन् केवळ माणिकराव गावित यांची पक्षनिष्ठा, विजयी घौडदौडाची हॅटट्रीक व गांधी कुटुंबावरील प्रेम यामुळेच शक्य झाले. त्यांच्या रूपाने नंदुरबारचे नाव देशाच्या नकाशावर झळकले. एकीकडे त्यांना मंत्रीपद मिळाल्याच्या आनंदाने धुळे-नंदुरबार जिल्हा आनंदाने चिंब झाला होता. हॅटट्रीकसोबतच मंत्रीपदामुळे नंदुरबार मतदारसंघाची इतिहासात नोंद झाली आहे.(latest marathi news)

संसदेतील २५ वर्षपूर्ती होत असतांना...

दिवगंत खासदार माणिकराव गावित यांना २००६ मध्ये संसदेत २५ वर्षे पूर्ण होत होते. त्याच काळात ते देशाचे केंद्रीय गृहराज्य मंत्री झाले, हा दुग्धशर्करा योग होता. या दुग्ध शर्करा योगाच्या संगमाने नंदुरबार -धुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचेच नव्हे.

तर माणिकराव गावित यांच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. २९ ऑगष्टला त्यांचा वाढदिवस जोरात साजरा करण्याचे नियोजन सुरू होते. संसदेतील २५ वर्षाचा त्यांच्या कामाचा लेखाजोखा तज्ज्ञांनी स्मरणिकेत मांडून त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले होते.

खोट्या आरोपातून निर्दोष

केंद्रीय गृहराज्यमंत्री असतांना २००६ मध्ये तुरूंगातील कैदी असलेल्या भाटी प्रकरणात फोन संभाषणावरून एका वृत्तवाहिनीने माणिकराव गावित यांचे खोटे स्ट्रींग ऑपरेशन करीत त्यांच्या साधा-भोळा स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणाने देशातील कोणालाही खरे वाटत नसलेले चित्र पुढे आणले गेले. मात्र अशा गंभीर आरोपानंतरही तत्कालीन गृहराज्यमंत्री गावित जराही डगमगले नाहीत. कर नाही तर डर कशाला ,असे म्हणत आरोप सिध्द झाल्यास राजकिय संन्यास घेईन असे आत्मविश्‍वासाने सांगणारे स्व. गावित यांच्यासोबत नंदुरबारचेही नाव देशभर झळकले.

स्वपक्षीयांसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनीही माणिकराव गावित असे करूच शकत नसल्याचा ठामपणे विश्‍वास व्यक्त केला होता.त्यात भाजपच्या स्व. सुषमा स्वराज व अन्य नेत्यांचाही समावेश होता. गावित अखेर चौकशीत निर्दोष निघाले. ती फोन टॅपिंग बनावट असल्याचे सिध्द झाले. गावित यांना क्लिन चीट मिळाले. त्यामुळे गावित हे संसदेतील तावून सुलाखून निघालेले माणिक ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT