The dam built by the forest department and the first to burst in rain. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : वन विभागाच्या कामांमुळे शेतकऱ्‍यांचे नुकसान; निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे विहिरीला तडे

Nandurbar : तालुक्यातील रनाळे येथे वन विभागाने वनतळे, नालाबांध अशी कामे केली आहेत; परंतु ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे पहिल्याच पावसात शेतातील पिकांचे तसेच विहिरीचे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यातील रनाळे येथे वन विभागाने वनतळे, नालाबांध अशी कामे केली आहेत; परंतु ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे पहिल्याच पावसात शेतातील पिकांचे तसेच विहिरीचे नुकसान झाले. विशेष म्हणजे ही कामे करत असताना संबंधित शेतकऱ्याची परवानगीदेखील घेण्यात आलेली नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अन्यथा वन विभागावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. (Farmers loss due to forest department work)

याबाबत चंद्रकांत भगवान मिस्त्री यांनी नंदुरबार येथील वनक्षेत्रपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की त्यांचे रनाळे शिवारातील शेत गट क्रमांक- ५४६/ई असून, वन विभागामार्फत आमची पूर्वपरवानगी न घेता शेतात वनतळे, नालाबांध यांसारखी कामे केली आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली आहेत. वन विभागाच्या जागी खोलीकरण करताना तेथे फक्त मातीचे कच्चे बांध उभारले गेले आहेत. त्यात डबर, दगड, पिचिंग करण्यात आलेली नाही. (latest marathi news)

तेथील काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे. खोलीकरण केलेल्या नाल्यात पावसाच्या पाण्याने पाणी भरून हे संपूर्ण पाणी त्यांच्या व त्यांच्या भावकीच्या शेतात गेल्याने शेताचे संपूर्णपणे नुकसान झाले. पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले. विहिरीलादेखील पाण्याच्या प्रवाहाने तडे गेले आहेत. त्यामुळे त्यांचे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. शेताची नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT