Minister present at the inauguration of the scheme 'One station one producer' at the railway station. Vijaykumar Gavit, Dr. Heena Gavit et al.
Minister present at the inauguration of the scheme 'One station one producer' at the railway station. Vijaykumar Gavit, Dr. Heena Gavit et al. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : एक स्थानक एक उत्पादक योजनेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे येथील रेल्वेस्थानकावर ‘एक स्थानक एक उत्पादक’ योजनेचे उद्‍घाटन करण्यात आले. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘एक स्थानक एक उत्पादक’अंतर्गत लावण्यात आलेल्या स्टॉलला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली. खासदार डॉ. हीना गावित यांनी अनेक वर्षे रखडलेले नंदुरबार. (Nandurbar Inauguration of One Station One Product Scheme)

जळगाव रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्वास आणणे, रेल्वेमार्गावरील धान्य गुदाम नंदुरबार येथे कार्यरत करणे, नंदुरबार रेल्वेस्थानकाला आधुनिक सुविधा मिळवून देणे या कामांचा उल्लेख करून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदारांना अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी एक खासदार म्हणून कसे प्रयत्न केले याची थोडक्यात माहिती दिली.

मोदी सरकारमुळे सामान्य लोकांना प्रभावी स्वरूपात रेल्वे सेवा प्राप्त झाल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, की अमृत भारत स्टेशन योजनेची उपलब्धी त्याचाच भाग आहे. (latest marathi news)

सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी नंदुरबार रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी प्राप्त झाला आहे आणि चौथा प्लॅटफॉर्म निर्माण करणे, वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी बॅटरीवर चालणारे चेअर उपलब्ध करणे, दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसविणे यांसारख्या सुविधा लवकरच उपलब्ध होतील.

अशी माहिती दिली. रेल्वे विभागाच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, भाजप महिला पदाधिकारी सपना अग्रवाल सविता जयस्वाल यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT