Nandurbar Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : 11 उमेदवार रिंगणात; 5 जणांची माघार

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी सोमवारी (ता. २९) अंतिम दिवशी पाच अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी सोमवारी (ता. २९) अंतिम दिवशी पाच अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात ११ उमेदवार आहेत. (Nandurbar Lok Sabha Constituency 11 candidates will contest election 5 people withdrew)

त्यातही खरी लढत भाजप व काँग्रेसमध्येच आमने-सामने रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, माघारीनंतर रिंगणातील उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना चिन्हवाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणुकीसंदर्भातील तपशिलाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी ७७ उमेदवारी अर्ज विक्री झाले होते.

त्यानंतर अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल होती. त्या दिवसअखेर १६ जणांनी १९ उमेदवारी अर्ज भरले होते. त्यानंतर छाननीत तीन अर्ज बाद झाले होते. त्यामुळे १६ अर्ज वैध ठरले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी माघारीची अंतिम मुदत होती. त्यात पाच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळे निवडणूक रिंगणात ११ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यात भाजपच्या डॉ. हीना गावित व काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांच्यात खरी लढत होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत रिंगणातील इतर नऊ उमेदवार किती मते खातात व ते कोणाला मारक अन् कोणाला तारक ठरतात याकडे आता मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, माघारीनंतर रिंगणातील उमेदवारांच्या उपस्थितीत प्रशासनाने बैठक घेऊन त्यांना चिन्हवाटप केले, तसेच निवडणूक काळातील आचारसंहितेसह त्यांचे कर्तव्य व निवडणूक खर्चाचा तपशील आदींबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. या वेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे आदी उपस्थित होते.

निवडणूक रिंगणातील उमेदवाराचे नाव पक्ष (कंसात चिन्ह)

आनंदा सुकलाल कोळी बहुजन समाज पार्टी (हत्ती)

ॲड. गोवाल के. पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पंजा)डॉ. हीना विजयकुमार गावित भाजप (कमळ)

निर्मला वसावे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (आटो रिक्षा)

रवींद्र रणजित वळवी भारतीय आदिवासी पार्टी (हॉकी स्टिक-बॉल)

रोहिदास गेमजी वळवी अपक्ष (बॅटरी-टॉर्च) हेमंत मन्साराम कोळी वंचित बहुजन आघाडी (प्रेशर कुकर)

गीतांजली कोळी अपक्ष (माइक)

जालमसिंग सुतुम पवार अपक्ष (ट्रक)

दीपककुमार मधुकर शिरसाठ अपक्ष (शिट्टी)

सुशीलकुमार जहाँगीर पावरा अपक्ष (नागरिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT