Nandurbar Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : ‘दे धक्का’ ची जादू चालणार की डॉ.हिना गावित हॅट्‌ट्रीक साधणार?

Lok Sabha Constituency : डॉ. हिना गावित यांच्या विरोधात धक्का तंत्राचा वापर करीत कॉंग्रेसच्या उमेदवारास मदत केल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे निवडणुक झाली असली तरी निकालाची प्रतीक्षा साऱ्यांनाच लागली आहे.

धनराज माळी

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नेहमीप्रमाणे यंदाच्याही निवडणुकीत चुरस होती, मात्र यावेळेस भाजपच्या मित्र पक्षांसह भाजपमधीलच काही पदाधिकारी भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना विरोध असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मित्रपक्षांसह स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनीही डॉ. हिना गावित यांच्या विरोधात धक्का तंत्राचा वापर करीत कॉंग्रेसच्या उमेदवारास मदत केल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे निवडणुक झाली असली तरी निकालाची प्रतीक्षा साऱ्यांनाच लागली आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

कारण ‘दे धक्का’ तंत्राचा वापर करणाऱ्या कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होण्याचा दावा करीत आहेत तर भाजपचे नेते व पदाधिकारी डॉ. हिना गावितच लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, असे ठासून सांगू लागले आहेत. त्यामुळे ‘दे धक्का’ची जादू चालणार की डॉ.हिना गावित हॅट्‌ट्रीक साधणार याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘दे धक्का’ ...हा एक मराठी चित्रपट आहे. त्या चित्रपटात एकमेकांना धक्का मारत एकीची ताकद निर्माण करतात.

तसेच चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदार संघात निर्माण झाले आहे. तसे ‘दे धक्का’ तंत्र हे नंदुरबार विधानसभा क्षेत्रासाठी नवीन नाही. कारण यापूर्वीही २००९ मध्ये नंदुरबार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुहासिनी नटावदकर या उमेदवार असतांना तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले विद्यमान भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना पराभूत करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हे तंत्र वापरल्याचे बोलले जाते.

मात्र तेव्हा अपयश आले होते. तेच तंत्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वापरले गेल्याचे बोलले जात आहे. फरक फक्त एवढाच होता की, तेव्हा बापाला पराभूत करायचे होते आता त्यांच्या लेकीला पराभूत करण्यासाठी हा खटाटोप केला गेल्याचे बोलले जात आहे. श्री. रघुवंशी तेव्हा राष्ट्रवादी -कॉंग्रेस आघाडीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. तर आता भाजप महायुतीतील शिवसेनेचे नेते आहेत. म्हणजेच दोन्हीही वेळेचा विचार केल्यास डॉ. गावित व श्री. रघुवंशी मित्र पक्षातील नेते आहेत. (latest marathi news)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. गावित परिवाराला श्री. रघुवंशी यांच्यासह भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध केला होता. मात्र मतदानाचा आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यामुळे श्री. रघुवंशी यांनी विरोध न करता शेवटच्या टप्यात न्यूट्रल राहत शांत बसले. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही न जुमानता कॉंग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना मदत केली.

मित्र पक्षाच्या उमेदवाराला धक्का देत त्यांच्या विरोधातील म्हणजेच कॉंग्रेसच्या उमेदवाराला बळ दिले. त्यातून कॉंग्रेसचे उमेदवार कसे विजयी होतील, यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दे धक्का तंत्राची जादू चालणार असल्याचा दावा कॉंग्रेस गटाने केला असून ‘अब की बार गोवाल पाडवी नंदुरबार के खासदार’ असा नारा लावला जात आहे. तर भाजप व गावित समर्थकांकडून ‘अब की बार हिनाताई हॅट्‌ट्रीक पार’ असे बोलले जात आहे. त्यामुळे निकालानंतरच स्पष्ट होईल की, दे धक्का जादू कर गई की दे धक्का पुन्हा अपयशी ठरला.

मंत्री पदाच्या लॉटरीची शक्यता

डॉ. हिना गावित यांना मागील काळातच केंद्रात मंत्री पदाची संधी चालून आली होती, मात्र काही कारणास्तव ती हुकली. मात्र यावेळेस जर त्यांनी हॅट्‌ट्रीक केली तर त्यांच्या रूपाने नंदुरबार लोकसभेला केंद्रीय मंत्रीपदाची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा व अन्य बडे नेते डॉ. हिना गावित यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे भाजप व त्यांच्या समर्थकांकडून लाल दिव्याची गाडी घेऊनच ताई दिल्लीतून परततील असा दावा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT