While filing nomination form with District Election Officer Manisha Khatri Congress candidate Adv. Gowaal Padavi.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : मुहूर्त साधत कॉंग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवीकडून अर्ज दाखल

Nandurbar : कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल के. पाडवी यांनी शुभ मुहूर्ताची वेळ साधत सोमवारी जिल्हा निवडणुक अधिकारी मनिषा खत्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल के. पाडवी यांनी शुभ मुहूर्ताची वेळ साधत सोमवारी (ता.२२) जिल्हा निवडणुक अधिकारी मनिषा खत्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, उमेदवारी अर्ज दाखलसाठी २५ एप्रिल निश्‍चित झाली असून त्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency Congress candidate Adv. Gowaal Padavi Application filed)

नंदुरबार लोकसभेसाठी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्यातर्फे २३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचे निश्‍चित करीत तसा निरोप कार्यकर्त्यांना दिला होता. सोशलमिडियावरही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्या दिवशी भगवान हनुमान जयंती असल्याने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असतात.

म्हणून सर्व सहकारी कार्यकर्ते यांनी या दिवशी त्यांची यायची इच्छा नसल्याने आणि सप्तशृंगी माता यात्रा त्यादिवशी असल्याने तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी इच्छा सर्व कार्यकर्त्यांची होती. म्हणून २३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल न करता २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचे ठरले. (latest marathi news)

संजय टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी दहाला आयोजित उमेदवारी अर्ज दाखल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे नियोजन ठरलेले असताना सोमवारी भाजपचे उमेदवार शक्तीप्रदर्शनाने रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना त्यापूर्वीच कॉंग्रेसचे उमेदवार ॲंड. गोवाल पाडवी हे मोजक्या कार्यकर्त्यांसह जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोचत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी माजी खासदार बापू चौरे, शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील. उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी,अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रकारामुळे सारेच आश्‍चर्य चकित झाले. मात्र ॲड. गोवाल पाडवी यांनी सोमवारचा मुहूर्त साधत अर्ज दाखल केला आहे. २५ एप्रिल रोजी त्यांची शक्तीप्रदर्शन रॅलीद्वारे पुन्हा अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT