Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : अवघ्या 48 तासांत खुनाचा छडा! शहादा पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

Nandurbar Crime : शहरातील सदाशिवनगर येथील रहिवासी व शहादा आगारातील वाहक राजेंद्र मराठे यांचा जळालेला मृतदेह आढळला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : शहरातील सदाशिवनगर येथील रहिवासी व शहादा आगारातील वाहक राजेंद्र मराठे यांचा जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या ४८ तासांतच शहादा पोलिसांनी खुनाचा छडा लावला असून, या खून प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

राजेंद्र मराठे शहरातील सदाशिवनगर येथील रहिवासी असून, ते १४ मार्चला किराणा सामान घेऊन येतो म्हणून घरातून निघून गेले होते. (Nandurbar Murder case solved in 48 hours)

मात्र बराच वेळ होऊही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे पत्नी मनीषा आणि मुलगा यांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी शहादा पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. त्यांचा शोध सुरू असताना १६ मार्चला नांदर्डे (ता. शहादा) शिवारात फरशीपुलाजवळ पोलिसांना एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

हा मृतदेह मराठे यांचाच असल्याची खात्री पटल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा, तसेच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा शहादा पोलिसांनी दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. (latest marathi news)

गुन्ह्यात त्यांचा जावई गोविंद सोनारला संशयाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मराठे यांची प्रथम गळा आवळून आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर केमिकल टाकून जाळण्यात आले होते. हत्येनंतर चारही मारेकरी सुरतला पळून गेले होते.

सुरतहून ते गोराई येथे आले होते. ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिस पथकाने गोराई येथून संशयित नीलेश पाटील, लकी बिरारी या दोघांसह १६ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. संशयितांना मंगळवारी (ता. १९) सायंकाळी न्यायालयात हजर केले. त्यांच्याकडून आणखी अधिक माहिती मिळू शकते, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT