Garlic and wooden bullock carts esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोदा यात्रोत्सवातून कांदा, लसूण हद्दपार; बैलगाड्यांचे वैभवही झाले इतिहासजमा

Nandurbar News : तालुक्यातील शेत शिवारातून कांद्याचे पीक हद्दपार झाल्याबरोबर येथील तीन राज्यात प्रसिद्ध असलेल्या कालिका माता यात्रेत देखील कांदा हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

फुंदीलाल माळी

तळोदा : तालुक्यातील शेत शिवारातून कांद्याचे पीक हद्दपार झाल्याबरोबर येथील तीन राज्यात प्रसिद्ध असलेल्या कालिका माता यात्रेत देखील कांदा हद्दपार झाल्याचे चित्र आहे. वर्षभरात लागणारा कांदा, लसूण व मसाल्याचे पदार्थ एकदाच खरेदी करून ठेवण्याची प्रथा व परंपरा तळोदा परिसरात होती. (Onion garlic expelled from Taloda Yatrotsav)

त्यामुळे यात्रेत देखील कांदा व लसूण यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, आता ती केवळ एक आठवण राहिली आहे. यात्रेत कांद्याची लागणारी दुकाने आता हद्दपार झाली आहेत. तीच स्थिती लाकडी बैलगाड्यांची झाली आहे. त्यामुळे कांदा, लसूण व बैलगाड्यांचे वैभव आता इतिहासजमा झाले आहे.

तळोदा तालुक्यात कांदा व लसूण या दोन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ऊस पिकाबरोबरच उसामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली जात असे. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. त्याच काळात अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर कालिका मातेची यात्रा भरत असल्याने यात्रेतच कांदा व लसूणची खरेदी व विक्री करावी.

असा प्रघात तळोदा परिसरात होता. मात्र, काळ बदलला तसा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीदेखील बदलवली व एकच पीक पद्धतीमुळे कांदा व लसूण, भाजीपाल्याचे उत्पादन शेतातून गायब झाले. त्याचा परिणाम म्हणून एकेकाळी संपूर्ण नंदुरबार-धुळे जिल्ह्याला कांदा, लसूण व भाजीपाला पुरवणारा तळोदा तालुका आता या पिकांसाठी धुळे व नाशिक जिल्ह्यावर अवलंबून आहे. (latest marathi news)

त्यातच तळोद्यातील प्रसिद्ध कालिकामातेच्या यात्रेत कांदा व लसणाची होणारी उलाढाल बंद झाली असून, आता कालिकामातेच्या यात्रेत एकही कांदा लसूणचे दुकान लावले जात नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बाहेरील तालुक्यातून कांदा मागवण्यावर भर दिला जात आहे.

यांत्रिकीकरणाचा परिणाम

दुसरीकडे बैलांच्या मदतीने शेती केली जात असताना लाकडी बैलगाड्यांना मोठी मागणी असे. तळोद्याच्या सुतार व लोहार समाजात लाकडी बैलगाडी तयार करणारे उच्च दर्जाचे कारागिर होते. धुळे, साक्री, नंदुरबार, सागबारा, डेडियापाडा, सेंधवा, शिरपूर परिसरातून तेथील शेतकरी लाकडी बैलगाडी घेण्यासाठी तळोदा येथे येत. मात्र, यांत्रिक पद्धतीने शेती केली जात असल्याने व बैलांची संख्या देखील कमी झाल्याने लाकडी बैलगाड्यांची जागा लोखंडी बैलगाडीने घेतली आहे.

"कांदा, लसूण व इतर शेतमालाची दुकान यात्रेत लावण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. परिसरातच कांदा व लसूणचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र, येथील शेत शिवारातून कांदा व लसूण पीक गायब झाले आहे. वर्षभर खरेदी-विक्री सुरू राहत असल्याने यात्रेतील दुकाने लावणे बंद झाले आहे. - विलास राणे, कांदा-लसूण विक्रेते, तळोदा

"शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत बदल केले आहेत. एकच पीक पद्धत असल्याने सर्वच शेतकरी एकच पीक घेताना दिसून येतात. मात्र, त्यामुळे कांदा, लसूण व भाजीपाला पीक गायब झाले आहे. ते वैभव पुन्हा प्राप्त होणे गरजेचे आहे." - बन्सीलाल सूर्यवंशी, शेतकरी, तळोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

SCROLL FOR NEXT