Avinash Marathe moderating the meeting. Congress national general secretary and star campaigner Priyanka Gandhi etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ‘त्यांचा’ आवाज गुंजला प्रियांका गांधींच्या सभेत; अविनाश मराठे यांना नंदुरबारच्या सभेत सूत्रसंचालनाची संधी

Nandurbar : तळोद्यातील नागरिक विविध क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांपैकी काहींनी तर त्या-त्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

सम्राट महाजन

Nandurbar News : तळोद्यातील नागरिक विविध क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांपैकी काहींनी तर त्या-त्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अशीच एक मोठी झेप शहरातील एका अवलिया सूत्रसंचालकाने घेतली आहे. अविनाश मराठे त्यांचे नाव असून, त्यांना चक्क काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असलेल्या, काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव तथा स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्या सभेत सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. opportunity for Avinash Marathe to moderate meeting of priyanka gandhi )

कार्यक्रम सांस्कृतिक, सार्वजनिक अथवा राजकीय असो, कोणत्याही कार्यक्रमाला त्याच्या स्वरूपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम सूत्रसंचालक करीत असतो. त्यामुळेच सूत्रसंचालकाला कार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळींप्रमाणेच महत्त्व असते. सूत्रसंचालक हा व्यासपीठ आणि श्रोते-प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असतो. एकप्रकारे कार्यक्रम खुलविण्याचे काम सूत्रसंचालक करीत असतो.

त्यामुळे अशा या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारीदेखील त्या क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींनाच दिली जाते. अशीच एक मोठी जबाबदारी सोबतच संधी तळोद्यासारख्या दुर्गम भागातील अवलिया सूत्रसंचालक अविनाश मराठे यांना एका राजकीय कार्यक्रमात मिळाली.अविनाश मराठे हे नाव तळोद्याला परिचित आहे. सुरवातीच्या काळात ते छंद म्हणून सूत्रसंचालन करीत होते, मात्र नंतर त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागल्यावर ते अलीकडे सूत्रसंचालनाकडे व्यवसाय म्हणून बघू लागले आहेत आणि यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील चालवीत आहेत.

शहरात अथवा तालुक्यात कोठेही छोटा-मोठा कार्यक्रम असो त्यात सूत्रसंचालन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येते. आतापर्यंत त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘बॉर्डर’फेम अभिनेता सुदेश बेरी, ‘राऊडी राठोड’फेम अभिनेता यशपाल शर्मा तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, निशिगंधा वाड यांच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन केले आहे.(latest marathi news)

मात्र शनिवारी (ता. ११) नंदुरबार येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव तथा स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्या सभेत त्यांना सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आजच्या सभेतदेखील अतिशय सुरेख असे सूत्रसंचालन करीत आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

''आजपर्यंत अनेक नेत्यांच्या सभेत सूत्रसंचालन करण्याचा योग आला. मात्र माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आला. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभेत सूत्रसंचालन करण्याची संधी प्राप्त झाली, हे माझ्यासाठी व तळोद्यासाठी गौरवास्पद आहे.''-अविनाश मराठे

''अविनाश मराठे यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जाहीर सभेत केलेले सूत्रसंचालन तळोदा शहराकरिताच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याकरिता गौरवास्पद आहे. एका राष्ट्रीय नेत्याच्या व्यासपीठावर त्यांनी अतिशय जबाबदारीने व योग्य सूत्रसंचालन करून अतिदुर्गम भागातील आपल्या तळोदा शहराचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध केले.''-संदीप परदेशी, तळोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT