Nandurbar MP Heena Gavit, present at a resort where MLA Rajesh Padvi and BJP office bearers  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ‘त्या’ व्हायरल छायाचित्राने घडविले ‘एकी’चे दर्शन; डॉ. गावित- पाडवी यांच्या गुप्त भेटीने चर्चांना उधाण

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून जिल्ह्यात देखील अनेक हालचाली बघायला मिळत आहेत.

सम्राट महाजन

तळोदा : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून जिल्ह्यात देखील अनेक हालचाली बघायला मिळत आहेत. काही ठिकाणी पक्ष अंतर्गत राजकीय कलह वाढत आहे तर काही ठिकाणी कलह दूर होतांना दिसत आहेत. अशातच भाजपच्या खासदारपदाच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. हिना गावित व आमदार राजेश पाडवी हे एकत्र आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Nandurbar News)

गेल्या चार वर्षातील दोघा नेत्यांमधील काही प्रसंगातील कलह बघता, हा फोटो बघून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नक्कीच आनंद झाला असेल. मात्र दोघा नेत्यांमधील हे सामंजस्य किती फायद्याचे ठरले हे येणाऱ्या काळातच कळणार आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित व शहादा-तळोदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्यातील राजकीय तणाव लपून राहिलेला नाही.

मागील चार वर्षांचा कालावधीत अनेकदा ही राजकीय कटुता जाहीररीत्या दिसून आली आहे. या काळात पक्ष पातळीवर या दोघा लोकप्रतिनिधींमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देखील झाला असल्याचे बोलले जाते. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नसल्याचे वारंवार दिसून आले. पक्षाचा किंवा इतर अनेक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येण्याचे दोघांनी टाळले होते.

मात्र लोकसभा निवडणूकीपूर्वी नंदुरबार येथील एका रिसॉर्टवर दोन्ही लोकप्रतिनिधींची भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः दोन्ही नेत्यांनी कोणत्याही मध्यस्थाची मदत न घेता ही भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी काय चर्चा झाली हे गुप्त असले तरी लोकसभा निवडणूकनंतर विधानसभा निवडणूक असल्याने एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असेच काहीतरी संकेत या भेटीत प्राप्त होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Nandurbar Political News)

दरम्यान या खासगी भेटीनंतर एक फोटो सोशल मीडियावर विविध ग्रुपवर व्हायरल होत असून यात डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या सदस्या हेमलता शितोळे, भाजप तालुकाप्रमुख प्रकाश वळवी, भाजप शहरप्रमुख गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, नारायण ठाकरे दिसून येत आहेत.

भाजपच्या या दिग्गज नेत्यांची भेट घडवून आणण्यासाठी शहादा, तळोदा तसेच नंदुरबार येथील भाजपचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले असल्याचे बोलले जाते. मात्र यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झाला आहे. मात्र दोघा नेत्यांमधील वाद खरोखरच संपुष्टात येऊन त्याचा फायदा भाजपला होईल का हे तर येणाऱ्या काळातच कळेल.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गोची टळणार -

दरम्यान मागील काळात खासदार डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी यांच्यातील राजकीय तणावामुळे शहादा, तळोदा तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते यांच्यापुढे कोणाची बाजू घ्यावी असे धर्म संकटासारखे प्रसंग अनेकदा आलेत. त्यातून सर्वांची गोची होत असे. तसेच सर्व सामान्य कार्यकर्ते देखील दोघेही लोकप्रतिनिधींकडे कामासाठी जात होते व त्यांनाही यामुळे नाईलाज होत होता. मात्र ताज्या घडामोडीमुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT