Congress central leader Jairam Ramesh speaking at a press conference on the occasion of Bharat Jodo Adivasi Yatra of Congress. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : काँग्रेस रामाचा पुजारी, तर भाजप रामाचा व्यापारी : जयराम रमेश

Nandurbar News : काँग्रेस पक्ष पाच न्यायांवर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना आधार, सामाजिक न्याय यांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : काँग्रेस पक्ष पाच न्यायांवर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना आधार, सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. ही एका व्यक्तीची गॅरंटी नसून संपूर्ण काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे. त्यासाठीच खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा सुरू आहे. राजकीय यात्रा असली तरी विचारधारा आहे. काँग्रेस पक्ष रामाचा पुजारी, तर भाजप रामाचा व्यापारी आहे, असा सडेतोड आरोप काँग्रेसचे केंद्रीय नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केला. (Nandurbar press conference on occasion of Bharat Jodo Nyay Yatra at Nandurbar)

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा गुजरातमधून मंगळवारी (ता. १२) महाराष्ट्रात प्रवेश केला. त्याचा प्रारंभ नंदुरबार येथून झाला. कार्यक्रमापूर्वी काँग्रेसचे केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले, की काँग्रेस पक्षातर्फे खासदार गांधी यांनी १४ जानेवारीपासून मणिपूरपासून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

चार हजारांवर किलोमीटर अंतर पार करून या यात्रेने मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष जनबंधन तयार करत आहे. काँग्रेस पक्षही पाच न्यायांवर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना काम आणि सामाजिक प्रश्‍नांचा यात समावेश आहे.

महिला, युवा आणि श्रमिकांसाठी विशेष काम सुरू असून, ही कोणा एका व्यक्तीची गॅरंटी नसून काँग्रेस पक्षाची गॅरंटी खासदार गांधी या न्याययात्रेचा माध्यमातून जनतेला देत आहेत. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे धनदांडग्या उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. तत्कालीन मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. (latest marathi news)

परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सध्याचे सरकार तयार नाही. सामाजिक जातीगणना झाली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. भाजप हे वॉशिंग मशिन आहे. त्यामुळे कोणीही प्रवेश केला की तेथे स्वच्छ होतात. ज्यांना आदर्श नाही ते पक्ष सोडून गेल्याने फरक पडत नाही. उलट असे लोक गेल्याने नवीन शेकडो कार्यकर्ते जोडले जातात. त्यांना नेतृत्वाची संधी मिळते. कोणी एकाने पक्ष सोडला तर नवीन लोकांसाठी दारे, खिडक्या उघडतात, असे सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार ॲड. के. सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, माजी मंत्री वसंत पुरके आदींसह जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.

नंदुरबारकर काँग्रेसच्या पाठीशी ः पटोले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील यात्रेचे स्वरूप व रूपरेषा मांडली. ते म्हणाले, की नंदुरबारची जनता नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिली आहे. आताही काँग्रेससोबत राहतील. गांधी परिवाराशी आदिवासी जनतेची नाळ कायम आहे. बाळासाहेब थोरात यांनी कार्यक्रमादरम्यान महाविकास आघाडीतील नेत शरद पवार, संजय राऊत हेही एका मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या वेळी पक्षांतराबाबतही पत्रकारांनी प्रश्‍न विचारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT