Nandurbar Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी 73 इच्छुकांकडून अर्ज खरेदी

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारांचे अर्ज विक्री व स्वीकृती कार्यक्रम सुरू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारांचे अर्ज विक्री व स्वीकृती कार्यक्रम सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी ३० जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते, तर आज त्यांची संख्या ७३ वर गेली आहे. या वर्षी इच्छुकांची संख्या वाढली आहे. गुरुवारी (ता. २५) अर्ज विक्री व स्वीकृतीचा अंतिम दिवस आहे. (Procurement of applications from 73 aspirants for Nandurbar Lok Sabha Constituency)

त्यामुळे शेवटच्या दिवशी किती अर्ज विक्री व स्वीकृती होतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे, एवढी चुरस निवडणुकीसाठी निर्माण झाली आहे. पक्षांच्या वाढत्या संख्येबरोबरच राजकारणाविषयी तरुणांमध्ये झालेल्या जागृतीमुळे राजकारणात येण्याचा अनेकांच्या इच्छा-आकांक्षा वाढल्या आहेत.

त्यामुळे निवडणूक आली, की राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची अनेकांची तयारी सुरू होते. काही जण केवळ नावाला उमेदवारी अर्ज भरातात, तर काही कोणीतरी नेत्याने आपली मनधरणी करावी म्हणून उमेदवारी करतात. शेवटी अमक्याने सांगितल्याने माघार घेतली म्हणत अर्ज मागे घेतात असेही हौसेनवसे आहेत. (Latest Marathi News)

त्यामुळे कधी नव्हे एवढे उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी विक्री झाले आहेत. त्यात राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनीही मुख्य उमेदवारास तांत्रिक अडचण आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डमी उमेदवारी दाखल करण्यासाठी अर्ज घेतलेले असतात. त्यांच्या सोबत यंदा अपक्षांचीही भरती जास्त आहे. त्यामुळे आजअखेर ७३ अर्जांची विक्री झाली आहे.

तर भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यासह त्यांच्या पक्षातर्फे डॉ. विजयकुमार गावित, डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांनी, तर काँग्रेसचे मुख्य उमेदवार ॲड. गोवाल पाडवी, अपक्ष म्हणून श्री. भंडारी यांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी अर्ज विक्री व स्वीकृतीचा अंतिम दिवस असल्याने ७३ पैकी किती जण उमेदवारी अर्ज भरतात याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT