crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : मनोरुग्ण महिलेची अत्याचारातून प्रसूती; अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील घटना

Nandurbar : मनोरुग्ण महिलेने गेल्या आठवड्यात स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिल्याचा संतापजनक, माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : अक्कलकुवा शहरात सुमारे दीड वर्षापासून महामार्गलगत अडगळीच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मनोरुग्ण महिलेने गेल्या आठवड्यात स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिल्याचा संतापजनक, माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील ही घटना घडली. शहरात गेल्या वर्षभरापूर्वी अज्ञात ठिकाणाहून एक अज्ञात मनोरुग्ण महिला महामार्गाच्या जवळ असलेल्या एका कार्यालयाच्या आवारात वास्तव्य करीत होती. (Psychiatric woman gives birth through torture )

महिलेच्या या अवस्थेचा गैरफायदा घेत विकृत मानसिकतेच्या कळस गाठत तिच्यावर अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. गेल्या आठवड्यात ती वास्तव्यास असलेल्या ठिकाणी प्रसूती झाली. मनोरुग्ण महिलेने जन्मास घातलेल्या नवजात अर्भकाच्या जीवितास धोका उद्भवू नये, तसेच त्याची हेळसांड होऊ नये यासाठी काहींनी पोलिसांशी संपर्क साधला साधण्यात आला. (latest marathi news)

ही माहिती समजताच नीताबाई माळी, भिकामचंद चव्हाण व अनिल अहिरे याच्या पथकाने नवजात अर्भकाला सुरक्षित अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आवश्यक ते प्राथमिक उपचार करून त्या नवजात अर्भकाला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील बालसदन केंद्रात पाठविले. विकृत मानसिकतेतून घडलेल्या या संतापजनक व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्व स्तरातून धिक्कार केला जात आहे.

यंत्रणा अनभिज्ञ

ही मनोरुग्ण महिला अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका कार्यालयाच्या आवारातील पडक्या इमारतीच्या ओट्यावर गेल्या दीड वर्षापासून वास्तव्यास होती. शहरात भटकंती करून ती याच ठिकाणी मुक्काम करीत होती. ही महिला कुठून आली ? याबाबत कोणीही शोध घेण्याची तसदी घेतली नाही. तिच्यावर अत्याचार झाला. नंतर तिची प्रसूती झाली. या प्रकाराला जबाबदार नेमकं कोण आहे, हा असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT