Kharif crops are stuck in flower due to lack of rain for a month. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Rain Crisis: दुष्काळाची छाया गडद; पूर्व भागात महिन्याभरापासून पावसाची दडी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Rain Crisis : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात तब्बल महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. ऐन श्रावणात पाऊस नसल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्व भागावरील दुष्काळाची छाया गडद झाली आहे. (Nandurbar Rain Crisis Shadow of drought darkens no raining in eastern part for month)

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भाग आणि शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम भाग हा पट्टा अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात दर वर्षी पावसाळा जेमतेमच असतो. या भागातील जनतेला दर दोन-तीन वर्षांनंतर दुष्काळाला सामोरे जावे लागते.

आता तर या भागातील पावसाचे प्रमाण दर वर्षी कमी कमी होत चालले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भागातील नद्या-नाल्यांना पूर आलेला नाही. परिणामी या भागातील धरणे व साठवण बंधारे कोरडेठाक पडले आहेत.

अशा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामासाठी गुंतविलेले भांडवलदेखील निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

पिके मृत्युशय्येवर

महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांची वाताहत झाली आहे. ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. कडधान्याची पिके वाया गेली आहेत. कापसाचे पीकदेखील शेवटची घटका मोजत आहे.

आता पाऊस आला तरी खरुपाच्या उत्पादनात फार मोठी घट येणार आहे. त्यामुळे यंदा पुन्हा दुष्काळाला तोंड द्यावे लागेल असे चित्र दिसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विहिरींनी गाठला तळ

गेल्या दोन वर्षांपासून नदी-नाल्यांना पूर न आल्यामुळे परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे.

त्यामुळे खरीप पिकांना पाण्याच्या पाळ्या देणे शेतकऱ्यांना अशक्य होत आहे. पूर्व भागातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच भेडसावू लागली आहे.

"महागडे बियाणे व खतांचे वाढलेले दर यामुळे या वर्षी खरीप हंगामाचे बजेट दुप्पट वाढले आहे. असे असताना पावसाने मात्र दुष्काळाच्या दारात नेऊन ठेवले आहे. अशा परिस्थितीत गुंतविलेला पैसादेखील निघणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे."

-एकनाथ माळी, शेतकरी, न्याहली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT