Teacher Recruitment esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Teacher Recruitment: शिक्षकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया; 268 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती

Teacher Recruitment : जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Teacher Recruitment : जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या पत्रान्वये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकातून तद्नंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांनमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे. ( Teacher Vacancies 268 Recruitment on Contractual basis )

त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, नंदुरबार मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची २६८ रिक्त पदे भरण्यासाठी २२ ते २६ जुलै अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, नंदुरबार या कार्यालयात मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या नावे अर्ज करावे, सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहिल व प्रतीमहिना मानधन २० हजार देय राहील. इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी निवृत्ती बाबत व इतर कागदपत्रांसह अर्ज सादर करावे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT